VIDEO : जिलेबीमध्ये बटाट्याची भाजी मिक्स विकत आहे दुकानदार, ग्राहक झाले हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:43 IST2023-07-10T12:43:36+5:302023-07-10T12:43:50+5:30

Viral Video : काही दिवसांआधी छोले भटुरे आणि आइसक्रीम असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण सध्या एक असं कॉम्बिनेशन व्हायरल झालं आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

Shopkeeper serving jalebi with aloo sabzi customer got angry watch viral video | VIDEO : जिलेबीमध्ये बटाट्याची भाजी मिक्स विकत आहे दुकानदार, ग्राहक झाले हैराण...

VIDEO : जिलेबीमध्ये बटाट्याची भाजी मिक्स विकत आहे दुकानदार, ग्राहक झाले हैराण...

Jalebi With Aloo Sabzi Video: जगभरातील लोक खाण्याच्या कॉम्बिनेशनचे व्हिडीओ शेअर करत असतात. जसे की, गुलाब जाम आणि आइसस्क्रीम, छोले आणि समोर, मॅगीसोबत आंब्याचा रस इत्यादी. असे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

काही दिवसांआधी छोले भटुरे आणि आइसक्रीम असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण सध्या एक असं कॉम्बिनेशन व्हायरल झालं आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

फूड ब्लॉगर्स नेहमीच रस्त्यावरील दुकानांचे व्हिडीओ शेअर करत असतात. जिलेबी तर अनेक आवडीने खाल्ली असेल. पण तुम्ही जिलेबी कधी आलूच्या भाजीसोबत खाण्याचा विचार केला का? अर्थात असा विचार कुणीही केला नसेल. पण सध्या या कॉम्बिनेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

भारतात असं एक ठिकाण आहे जिथे लोक रोज सकाळी जिलेबी आणि आलू म्हणजे बटाटाच्या भाजीचा आस्वाद घेतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो बघून लोक हैराण झाले आहेत. 

ट्विटरवर 'एमफ्यूचरवाला' नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात जिलेबीवर बटाटाच्या भाजी टाकताना दिसत आहे. त्यावर थोडं दही टाकलं. सामान्यपणे असं कचोरीसोबत केलं जातं. पण जिलेबीवर भाजी हे काही अनेकांना पचणी पडलं नाही. लोक यावर वेगवेगळ्या रिअॅक्शन देत आहेत. 

Web Title: Shopkeeper serving jalebi with aloo sabzi customer got angry watch viral video