आपण नेहमीच पाहतो की, सोशल मीडियात वेगवेगळ्या गोष्टी सतत व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल झालेल्या शूजने सर्वांना च्रकावून सोडलं आहे. या शूजच्या रंगामुळे लोकांना वेगवेगळे भ्रम होत आहेत. तुम्हीही एकदा बघा. काही लोकांना हा शूज पिंक म्हणजेच गुलाबी रंगाचा वाटत आहे, ज्याची बॉर्डर आणि लेस पांढऱ्या रंगाच्या आहेत. तर काही लोकांना हे शूज ग्रे आणि टील रंगाचे(ब्लू आणि ग्रीन रंगाचं कॉम्बिनेशन) दिसत आहे.
रंगाच्या अजब भ्रमामुळे हा शूज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. यूकेतील एक महिलेने फेसबुक या शूजचा फोटो शेअर केला आणि हे गुलाबी रंगाचे असल्याचे म्हटले, तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली. तसे तर हे शूज या महिलेल्या मैत्रिणीचे होते. पण यावर त्या महिलेल्या आईने म्हटले की, हे शूज ग्रे आणि ब्लू रंगाचे आहेत.
मेंदूचा कोणता भाग अधिक प्रभावी?
सत्य हे आहे की, शूज पिंक आणि व्हाइट रंगाचे आहेत. पण जास्तीत जास्त लोक या शूजचा रंग ग्रे आणि टी कलर बघत आहेत, त्यांचे डोळे त्यांची फसवणूक करत आहेत. अनेक अशा थेअरी आहेत ज्यातून हे गेलं आहे की, आपल्या मेंदूचा कोणता म्हणजे डावा की उजवा भाग प्रभावी आहे. यावर हे अवलंबून असतं की, तुम्ही कोणत्या रंगाला कसं बघणार. आता या शूजबाबतच घ्या की, जर तुमचा डावा मेंदू प्रभावी असेल तर तुम्ही शूजला ग्रे आणि टील रंगात बघाल, पण जर तुमचा उजवा मेंदू तुमच्यावर प्रभावी असेल तर तुम्ही या शूजचा पिंक आणि व्हाइट रंग बघाल.
मेंदूची डावी बाजू प्रभावी असेल तर - ज्या लोकांच्या मेंदूची डावी बाजू प्रभावी असते ते लोक जास्त लॉजिकल, प्रॅक्टिकल आणि विश्लेषण करणारे असतात.
मेंदूची उजवी बाजू प्रभावी असेल तर - ज्या लोकांच्या मेंदूची डावी बाजू प्रभावी असते ते अधिक कल्पनाशील, विचारशील आणि दुसऱ्यांची काळजी घेणावे व अंतर्ज्ञानी असतात.
बॅकग्रांउडच्या रंगाचा आणि लाइटचा प्रभाव
युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये ऑप्थालमोलॉजी आणि व्हिज्युअल सायन्सचे प्राध्यापक व्हॅली थिओरेसन सांगतात की, 'ज्या लोकांना हे शूज पिंक कलरचे दिसत आहेत ते बॅकग्राउंडला ब्लू लाइट बघत आहेत, तर जे लोक या शूजला ग्रे रंगात बघत आहेत ते त्यांना त्यांचा मेंदू सांगत आहे की, बॅकग्राउंडला व्हाइट लाइट आहे. या आपला मेंदू या फोटोतील हाताचा रंगही बघत आहे, ज्या हातांनी हे शूज धरले आहेत'.
ब्लॅक अॅन्ड ब्लू स्ट्राइप्ड ड्रेस होती चर्चेत
हे काही पहिल्यांदाच नाहीये की, एखाद्या वस्तूच्या रंगावरून इतकी चर्चा झाली. ३ वर्षांआधी सोशल मीडियात एक ड्रेस व्हायरल झाला होता. ज्याच्या रंगावरून सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीमध्ये चर्चा रंगली होती. काही लोक या स्ट्राइप्ड ड्रेसला व्हाइट आणि गोल्ड रंगात बघत होते तर काही लोक याला ब्लॅक अॅन्ड ब्लू सांगत होते.