Shocking news woman stung by scorpion united airlines flight | धक्कादायक! विमानात महिलेच्या पॅन्टमध्ये आढळला विंचू, एकदा नाही तर अनेकदा मारला डंख...
धक्कादायक! विमानात महिलेच्या पॅन्टमध्ये आढळला विंचू, एकदा नाही तर अनेकदा मारला डंख...

विमानात कधी काय होईल ना काही सांगता येत नाही. कधी भांडणं होतात, तर कुणी चुकून दरवाजा उघडतात. इतकेच काय तर हवा खाण्यासाठी खिडकीही उघडतात. काही विमानांमध्ये तर सापही आढळून आले आहेत. अशाच विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. आता हेच बघा ना...विमानात एका महिलेला विंचूने डंख मारला. एकदा नाही तर अनेकदा....

पॅन्टमध्ये होता विंचू

यूनायटेड एअरलाइन्स १५५४ विमानात ही घटना घडली. महिलेने गुरूवारी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोहून अटलांटा फ्लाइट पकडली. फ्लाइटमध्ये काही वेळाने तिला जाणवलं की, तिच्या पायांना काहीतरी टोचतंय. नंतर ते रेस्टरूममध्ये गेली. त्यावेळी तिच्या पॅन्टमधून थेट विंचू निघाला.

आता विंचू चावला म्हटल्यावर महिलेच्या पायांत असह्य अशा वेदना होत होत्या. कारण विंचवाने एकदा नाही तर अनेकदा डंख मारला होता. नंतर महिला जेव्हा विमानातून उतरली तेव्हा ती लगेच डॉक्टरांना भेटली. नंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एअरलाइन्सच्या प्रतिनिधीने सांगितले की, क्रू मेंबर्सनी महिलेची लगेच मदत केली. आता महिला ठीक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 


Web Title: Shocking news woman stung by scorpion united airlines flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.