धक्कादायक! ७ वर्षाच्या मुलाला गिफ्ट मिळाले होते Airpods त्याने ते गिळले आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 11:42 IST2020-01-04T11:42:04+5:302020-01-04T11:42:22+5:30

जगाच्या कानाकोपऱ्यातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विचित्र आणि अविश्वसनिय घटना वाचत असतो.

Shocking! 7 years boy swallows Airpod he received as Christmas gift in America | धक्कादायक! ७ वर्षाच्या मुलाला गिफ्ट मिळाले होते Airpods त्याने ते गिळले आणि.....

धक्कादायक! ७ वर्षाच्या मुलाला गिफ्ट मिळाले होते Airpods त्याने ते गिळले आणि.....

जगाच्या कानाकोपऱ्यातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विचित्र आणि अविश्वसनिय घटना वाचत असतो. कधी कुणाच्या कानातून झुरळ काढलं जातं तर कुणाच्या पाठीतून २ वर्षांनंतर बंदुकीची गोळी. अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेच्या जॉर्जियातून समोर आली आहे. येथील एका कपलने त्यांच्या मुलाला ख्रिसमसा Airpods गिफ्ट दिले होते. मुलगा केवळ ७ वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला जास्त समजत नाही. त्यामुळे त्याने हे Airpods तोंडात टाकले आणि गिळले. झालं गेले अ‍ॅपलचे एअरपॉड्स त्याच्या पोटात.

Kiara Stroud त्यांच्या मुलाला घेऊन लगेच डॉक्टरकडे गेल्या. आता त्याची स्थिती ठीक आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असून त्याला आवश्यक ती औषधे दिली आहेत.

डॉक्टरांनी मुलाचा एक्स-रे काढला तेव्हा दोन्ही एअरपॉड्स त्याच्या पोटात दिसले. डॉक्टर म्हणाले की, एअरपॉड्स आपोआप नॅच्युरल प्रोसेसने बाहेर येतील. मुलाची आई कियाराने सांगितले की, त्यांचा मुलगा फारच मस्तीखोर आहे. मस्ती-मस्तीमधेच त्याने एअरपॉड्स गिळले. पण त्या पलिकडे जाऊन प्रश्न हाही उभा राहतो की, ७ वर्षाच्या मुलाला कुणी एअरपॉड्स गिफ्ट देतं का?


Web Title: Shocking! 7 years boy swallows Airpod he received as Christmas gift in America