'या' आजीबाईचं इंग्रजी ऐकून शशी थरूरही म्हणतील... ठोको ताली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:36 IST2020-03-02T16:18:54+5:302020-03-02T16:36:50+5:30

बॉलीवूडच्या चित्रपटात आपल्याला अनेक प्रकारे इंग्रजी ऐकायला मिळत असते.  ज्याप्रमाणे आपण मराठी जशी वळेल तशी वळवत असतो. त्याच प्रमाणे ...

Shashi tharoor will shocked after watch this dadi's video, viral video | 'या' आजीबाईचं इंग्रजी ऐकून शशी थरूरही म्हणतील... ठोको ताली

'या' आजीबाईचं इंग्रजी ऐकून शशी थरूरही म्हणतील... ठोको ताली

बॉलीवूडच्या चित्रपटात आपल्याला अनेक प्रकारे इंग्रजी ऐकायला मिळत असते.  ज्याप्रमाणे आपण मराठी जशी वळेल तशी वळवत असतो. त्याच प्रमाणे  इंग्रजी भाषा आपल्या हटके स्टाईलप्रमाणे बोलत असलेल्या एका आजीचा व्हिडीयो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

अरूण बोथरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या आजीचा व्हिडीओ खूप पाहीला जातोय. पण अनेकांना असं  म्हटलयं की यांचं इंग्लिश ऐकून शशी थरूर सुद्धा टाळ्या वाजवेल. आत्तापर्यंत या व्हिडीयोला १ लाख ७६ हजार  व्यूज मिळाले आहेत.  कॅप्शनमध्ये असं लिहिलयं  की या आजीच्या इंग्रजी बोलण्याला तुम्ही किती मार्क्स द्याल. यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल ही आजी नेमकी कशाबद्दल इतक्या उत्साहीपणे बोलत आहे. तर जाणून घ्या. ( हे पण वाचा-एस्कलेटरचा ब्रश शूज स्वच्छ करण्यासाठी नसतो; जाणून घ्या त्यामागचं लॉजिक)


 ही आजीबाई महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलत आहे. यात त्या सांगत आहेत की महात्मा गांधी खूप सर्वसामान्य  कुटुंबातील होते. त्यांचं राहाणीमान सुद्धा साधं होतं.  ते बकरीचं दूध प्यायचे आणि साधा आहार घ्यायचे. ते राष्ट्रपिता होते. त्याचप्रमाणे अहिंसेच्या तत्वाचा त्यांनी स्वीकार केला होता.  या व्हिडीयोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ( हे पण वाचा-बाबो! 'या' भिकाऱ्यांना मिळतो वीक-ऑफ; दिवसानुसार बदलतात देवाचा फोटो, जाणून घ्या सत्य)

Web Title: Shashi tharoor will shocked after watch this dadi's video, viral video