भारतातही आहे बरमुडा ट्रायंगल, जेथून परत येणं आहे अशक्य; रहस्यमय आहे ठिकाण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:04 IST2023-06-09T12:03:45+5:302023-06-09T12:04:04+5:30
Shangri La Valley Mystery : इथे जेव्हाही एखादं विमान वरून जातं ते आपोआप खाली पडतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतातही असं एक ठिकाण आहे. जेथून परत येणं अशक्य आहे.

भारतातही आहे बरमुडा ट्रायंगल, जेथून परत येणं आहे अशक्य; रहस्यमय आहे ठिकाण...
Shangri La Valley Mystery : बरमूडा ट्रायंगलबाबत आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलं आहे. एक अशी रहस्यमय जागा जिथे शेकडो जहाज आणि विमान बेपत्ता झाले आहेत. इथे समुद्राखाली शेकडो जहाजांचा मलबा पडलेला आहे. साधारण 150 वर्षापासून लोक हे जहाज बघण्यासाठी इथे येतात. असं सांगितलं जातं की, इथे जेव्हाही एखादं विमान वरून जातं ते आपोआप खाली पडतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतातही असं एक ठिकाण आहे. जेथून परत येणं अशक्य आहे.
तिबेट आणि अरूणाचल प्रदेशच्या सीमेवर असलेला शांगरी ला घाट एक अशीच जागा आहे. याचं रहस्य आजपर्यंत कुणीही जाणू शकलं नाही. असं सांगितलं जातं की, हे ठिकाण फार खतरनाक आहे आणि इथे जर कुणी गेलं तर परत येणं अशक्य आहे. लोककथांमध्ये या ठिकाणाला फार पवित्र मानलं गेलं आहे. पण इथे येऊन कुणीही याबाबत जाणून घेण्यास घाबरतात. असं मानलं जातं की, इथे जाऊन एखादी वस्तू किंवा व्यक्ती गायब होतात.
प्रसिद्ध तंत्र साहित्य लेखक अरुण कुमार शर्मा यांनी त्यांचं पुस्तक ‘तिब्बत की वह रहस्यमय घाटी’ मध्ये याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं की, हे एक असं ठिकाण आहे जिथे एखादी व्यक्ती चुकून गेली तर त्यांचं परत येणं अशक्य आहे.
असं सांगितलं जातं की, या घाटावर वेळ थांबते, ज्यामुळे याच्यावरून विमानही उडत नाही. तिबेटमधील विद्वान युत्सुंग यांच्यानुसार, या ठिकाणाचा संबंध अंतराळातील दुसऱ्या लोकांशी आहे. युत्सुंग यांनी स्वत: तिथे गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्यानुसार तिथे ना सूर्याचा प्रकाश येतो ना ताऱ्यांचा. चारही बाजूने एक दुधी रंगाचा प्रकाश पसरला आहे. तसेच एक खास शांतता आहे.