आगा बाबो! 'या' जंगलात सापडलं जगातलं सर्वात मोठं उमललेलं फूल, इतकं की तुम्ही कल्पनाही केली नसेल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 13:22 IST2020-01-06T13:14:25+5:302020-01-06T13:22:37+5:30
या फुलाचं डिझाइन बऱ्याचअंशी सूर्यफुलासारखं असतं. पण रंग पिवळा नसून केशरी आणि पांढरा असतो.

आगा बाबो! 'या' जंगलात सापडलं जगातलं सर्वात मोठं उमललेलं फूल, इतकं की तुम्ही कल्पनाही केली नसेल....
इंडोनेशियातील पश्चिम मध्य सुमात्राच्या जंगलात जगातलं सर्वात मोठं उमललेलं फूल आढळून आलं आहे. हे फूल इतकं मोठं आहे की, याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. हे फूल चार फूट इतकं पसरलेलं आहे. या फुलाचं नाव आहे रेफलिसिया. हे रेफलिसिया फुलांमधील सर्वात मोठं फूल आहे.
याआधी २०१७ मध्ये याच जंगलात तीन फूट आणि १२ किलो वजनाचं रेफलिसिया फूल आढळून आलं होतं. हे त्यावेळचं सर्वात मोठं उमललेलं फूल होतं. ज्या झाडाला हे फूल लागतात त्या झाडाची फारच दुर्गंधी येते. मात्र, फूल फारच आकर्षक दिसतं.
या फुलाचं डिझाइन बऱ्याचअंशी सूर्यफुलासारखं असतं. पण रंग पिवळा नसून केशरी आणि पांढरा असतो. स्थानिक लोक या फुलाला मृतदेहाचं फूल असं म्हणतात. कारण या फुलाची फारच दुर्गंधी येते.
या फुलाच्या झाडाची खासियत ही आहे की, या झाडाला पाने किंवा मूळं नसतात. हे झाड त्यांचं जेवण आणि पाणी दुसऱ्या झाडांकडून मिळवतात. या फुलातील साठलेल्या द्रव्याकडे कीटक आकर्षित होतात आणि त्यात जाऊन अडकतात.
हे फूल काही महिन्यांसाठी उमलतं. याच्या उमलण्याची सुरूवात ऑक्टोबरपासून होते आणि पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत हे फूल पूर्णपणे उमललेलंच राहतं. पण या फुलांचं जीवन जास्त नसतं. हे फूल लवकर नष्ट होतं.