जगातला एक असा जीव, जो काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जगतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 16:03 IST2023-04-11T16:00:16+5:302023-04-11T16:03:57+5:30
आज आम्ही अशाच एका दुर्मीळ जीवाबाबत सांगणार आहोत. याची खासियत म्हणजे हा जीव काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो.

जगातला एक असा जीव, जो काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जगतो!
जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. काही दुर्मीळ जीव तर असेही आहेत ज्यांबाबत लोकांना काहीच माहीत नसतं. हे जीव सहसा कुणाच्या नजरेसही पडत नाहीत. आज आम्ही अशाच एका दुर्मीळ जीवाबाबत सांगणार आहोत. याची खासियत म्हणजे हा जीव काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो.
सॅलामॅंडर असं या जीवाचं नाव आहे. हा जीव दक्षिण पूर्व यूरोपमधील बोस्निया देशात आणि हर्जेगोविनामध्ये पाण्याखाली असलेल्या गुहांमध्ये आढळून आला. साधारण ७ वर्ष होऊन गेल्यावरही सॅलामॅडर आपल्या जागेवरून हलत नाही.
वैज्ञानिकांनुसार, या सॅलामॅंडरची त्वचा आणि अविकसित डोळे त्यांना अंध करतात. कदाचित हेच कारण आहे की, हा जीव आपल्या जागेवरून हलत नाही. पण एखादा जीव आपल्या जागेवरून न हलणं ही असामान्य बाब नाही.
सॅलामॅडर ज्या गुहेंमध्ये राहतात तिथे जेवण मिळणं सोपं नाही. त्यामुळे हा जीव काहीच न खाता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो. पण जेव्हाही सॅलामॅडर सक्षम होतात तेव्हा ते छोटे कीटक खाऊ शकतात.
सॅलामॅडरचं संपूर्ण आयुष्य पाण्याखाली जातं आणि त्याचं आयुष्य १०० वर्ष इतकं असतं. हा जीव साधारण स्लोवेनियापासून ते क्रोएशियासारख्या बाल्कन देशात आढळून येतो. सॅलामॅडर आपली जागा १२ वर्षांनी तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला जोडीदाराचा शोध घ्यायचा असतो.
हंगेरियन नॅच्युरल हिस्ट्री म्युझिअमचे ज्यूडिट वोरोस यांच्यानुसार, 'याआधी अशा जीवांची कल्पना केली गेली होती. इथे भरपूर पाऊस झाल्यावर हे जीव गुहेतून वाहून बाहेर आल्यानंतर आम्ही त्यांना बघू शकतो. नाही तर त्यांना बघण्यासाठी आम्हाला पाण्यातील गुहेंमध्ये जावं लागलं असतं. पण आता गुहेच्या पाण्यातील अंश बघूनच आम्ही हे सांगू शकतो की, ते तिथे आहेत किंवा नाही'.