Sadio Mane’s broken Mobile: अब्जो रुपये कमावणारा फुटबॉलर वापरतो तुटलेला मोबाइल? फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:48 PM2022-08-19T16:48:31+5:302022-08-19T16:49:02+5:30

स्टार फुटबॉलर सादियो मानेच्या तुटलेल्या फोनमागची गोष्ट ऐकून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

Sadio Mane’s broken Mobile: star footballer sadio mane cracked iphone photo viral | Sadio Mane’s broken Mobile: अब्जो रुपये कमावणारा फुटबॉलर वापरतो तुटलेला मोबाइल? फोटो व्हायरल...

Sadio Mane’s broken Mobile: अब्जो रुपये कमावणारा फुटबॉलर वापरतो तुटलेला मोबाइल? फोटो व्हायरल...

Next

Sadio Mane’s broken Mobile: पश्चिम आफ्रिकन देश सेनेगलचा स्टार फुटबॉलपटू सॅडियो मानेचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो अडीच वर्षे जुना आहे, पण आजही फोटो पाहून नेटकरी चकीत होतात. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या खेळाडूच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.


व्हायरल होत असलेल्या फोटोत फुटबॉलर सादियो माने हातात स्क्रीन तुटलेला iPhone 11 मोबाईल धरलेला दिसतोय. हा फोटो डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा समोर आला होता. त्यावेळी सादियो मानेची कमाई कोट्यवधी रुपये होती. आजही तो कोट्यावधी रुपये कमावतो. कोट्यवधी रुपये कमावणारा फुटबॉलपटू तुटलेला मोबाइल घेऊन का फिरतोय, याचा अनेकांना धक्का बसला. 

अडीच वर्षांपूर्वी हा फोटो समोर आला, तेव्हाही सादियो मानेला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने दिलेल्या उत्तराने अनेकांचे डोळे पानावले होते. तुम्ही याचे कारण ऐकले तर तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मूळात सादियो माने फोनपेक्षा आपल्या देशातील गरिबांकडे जास्त लक्ष देतो. एका मुलाखतीत सदियो माने तुटलेल्या मोबाईलबद्दल म्हणाला होता, 'मी असे हजार मोबाईल घेऊ शकतो. पण, मला याची गरज वाटत नाही. मी गरिबी पाहिली आहे, मला शाळेत जाता आले नाही. यामुळेच मी इतर वस्तुंवर पैसे खर्च करण्यापेक्षा माझ्या देशातील मुलांसाठी शाळा आणि फुटबॉल स्टेडियम बांधले आहेत.

साडिओ लिव्हरपूलचा महत्त्वाचा खेळाडू 
इंग्लिश क्लब लिव्हरपूलसाठी सॅडिओ माने हा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने क्लबसाठी 269 सामन्यात 120 गोल केले. सॅडिओ मानेच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्लब लिव्हरपूलने 2018-19 मध्ये चॅम्पियन्स लीग आणि 2019-20 मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले. साडिओने या वर्षी जर्मन क्लब बायर्न म्युनिचसोबत सुमारे 330 कोटी रुपयांचा (40 दशलक्ष युरो) तीन वर्षांचा करार केला आहे.
 

Web Title: Sadio Mane’s broken Mobile: star footballer sadio mane cracked iphone photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.