VIDEO : लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी रशियन तरूणी आणल्या, पाहुणे झाले आउट ऑफ कंट्रोल आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:37 IST2023-02-15T14:37:34+5:302023-02-15T14:37:55+5:30

Russian Girl In Wedding : काही ठिकाणी घरातील लोकांना पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी उभं केलं जातं. पण एका असा काही नजारा बघायला मिळाला की, येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रशियन तरूणी बोलवण्यात आल्या. 

Russian girl in wedding for welcome the guests Panditji could not control | VIDEO : लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी रशियन तरूणी आणल्या, पाहुणे झाले आउट ऑफ कंट्रोल आणि...

VIDEO : लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी रशियन तरूणी आणल्या, पाहुणे झाले आउट ऑफ कंट्रोल आणि...

Russian Girl In Wedding : जेव्हाही एखाद्या मुलीचं लग्न असतं तेव्हा मुलीचे वडील सगळी व्यवस्था बघतात. जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये. खाण्या-पिण्यासोबत म्युझिकल इव्हेंट्सही ठेवले जातात. काही ठिकाणी घरातील लोकांना पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी उभं केलं जातं. पण एका असा काही नजारा बघायला मिळाला की, येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रशियन तरूणी बोलवण्यात आल्या. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरीकडून पाहुण्यांच्या स्वागतासाठी परदेशी तरूणींना उभं करण्यात आलं. अर्थात यामुळे लग्नाची रौनक वाढली. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, या तरूणी लग्नात आलेल्या पाहुण्यांसोबत सेल्फी घेत आहेत. एक काका तर पाकिटातून पैसे काढतात आणि रशियन तरूणीला देऊ लागतात. 

इतकंच नाही तर लग्न लावण्यासाठी आलेल्या पंडितालाही रशियन तरूणी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. लग्नात आलेले पाहुणे तर रशियन तरूणींना पाहून अवाक् झाले. काहींचे हावभाव तर बघण्यासारखे होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर  _alysultan नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला  2 लाख 29 हजारांपेक्षा लाइक मिळाले आहेत. तर 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. 

Web Title: Russian girl in wedding for welcome the guests Panditji could not control