पूर्वी खाण्यासाठी नाही तर वेगळ्याच कामासाठी वापरत होते रूमाली रोटी, काम असं ज्यावर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:45 IST2026-01-21T11:44:37+5:302026-01-21T11:45:31+5:30

Rumali Roti Interesting Facts : अनेकांना हे माहीत नसेल की, जी रूमाली रोटी आज आपण खातो, ती खाण्यासाठी बनवलीच गेली नव्हती.

Rumali roti created to wipe excess oil from food during the mughal era not to eat | पूर्वी खाण्यासाठी नाही तर वेगळ्याच कामासाठी वापरत होते रूमाली रोटी, काम असं ज्यावर बसणार नाही विश्वास

पूर्वी खाण्यासाठी नाही तर वेगळ्याच कामासाठी वापरत होते रूमाली रोटी, काम असं ज्यावर बसणार नाही विश्वास

Rumali Roti Interesting Facts : मुघलांच्या काळात भारतात अनेक नवीन, टेस्टी पदार्थ आलेत, जे आजही मोठ्या आवडीने खाल्ले जातात. चपाती भारतीय जेवणातील महत्वाचा भाग असते. पण धाब्यावर जेवायला जाणाऱ्या लोकांमध्ये तंदूर रोटी आणि रूमाली रोटी चांगलीच लोकप्रिय असते. खासकरून नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये रूमाली रोटी अधिक पसंत केली जाते. मुलायम आणि मोठी रूमाली रोटी भरपूर लोकांना आवडते. पण अनेकांना हे माहीत नसेल की, जी रूमाली रोटी आज आपण खातो, ती खाण्यासाठी बनवलीच गेली नव्हती. ज्या कामासाठी रूमाली रोटी बनवण्यात येत होती, ते जर माहिती पडलं तर आपण रूमाली रोटी परत ऑर्डर करणार नाही. अशात रूमाली रोटी कशासाठी बनवण्यात आली होती हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या कामासाठी वापरली जात होती रूमाली रोटी?

मुळात रूमाली रोटीची सुरूवात मुघलांच्या शासनादरम्यान झाली होती. मुघल काळात शाही भोजनासोबत रूमाली रोटी सुद्धा वाढली जात होती. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी रूमाली रोटी खाल्ली जात नव्हती. वेगळ्याच कामासाठी याचा वापर केला जात होता. रूमाली रोटी तेव्हा जेवणातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी किंवा काही पुसण्यासाठी वापरली जात होते. तसेच रूमाली रोटी तेव्हा ताटातील पदार्थ पकडण्यासाठी देखील वापरली जात होती. 'रूमाली' म्हणजे रूमाल. ज्याचा वापर आपण हात, नाक आणि तोंड पुसण्यासाठी करतो. तसेच सामान्यपणे रूमालाचा वापर लोक काही गोष्टी पुसण्यासाठी करतात. इतकंच नाही तर रूमाली रोटीचा वापर त्यावेळी अन्न झाकण्यासाठी देखील केला जात होता. 

पहिल्यांदा कुठे बनवली?

त्या काळात रूमाली रोटी केवळ जेवणातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी बनवण्यात आली होती. मुघल काळात रूमाली रोटी रूमालासारखी घडी करून राजासाठी जेवणाच्या टेबलावर ठेवली जात होती. रूमाली रोटी मुलायम आणि पातळ असते. रूमाली रोटी सगळ्यात आधी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बनवण्यात आली होती. तिथे याला रूमाली रोटी नाही तर 'मांडा' किंवा 'लंबू रोटी' म्हटलं जातं. रूमाली रोटी सामान्यपणे घट्ट आणि मलाईदार करीसोबत खाल्ली जाते.

मुघल काळाशी नाते

काही लोकांचं मत आहे की, रूमाली रोटीचा उगम दिल्ली, लखनऊ आणि आसपासच्या भागांत झाला, जिथे मुघल दरबारात समृद्ध आणि नाजूक पदार्थांना विशेष महत्त्व होतं. राजदरबारात जड नान किंवा पराठ्यांऐवजी हलकी, पटकन तयार होणारी आणि सौम्य चवीची भाकरी/पोळी हवी होती यातून रूमाली रोटी लोकप्रिय झाली.

बनवण्याची खास पद्धत

पूर्वी रूमाली रोटी उलट्या तव्यावर भाजली जायची. या तव्यामुळे जास्त ताप लगेच मिळतो आणि रोटी क्षणार्धात फुगून शिजते यामुळे तिची पातळ, मुलायन रचना टिकते.

Web Title : रूमाली रोटी: कभी खाने के लिए नहीं, सफाई के लिए इस्तेमाल होती थी!

Web Summary : रूमाली रोटी, जो आज लोकप्रिय है, मुगल काल में खाने के लिए नहीं, बल्कि अतिरिक्त तेल सोखने और खाना संभालने के लिए बनी थी। यह कपड़े की तरह सफाई और खाना ढकने के काम भी आती थी। पंजाब में उत्पत्ति, अब पाककला पसंदीदा है।

Web Title : Rumali Roti: Once Used for Cleaning, Not Eating!

Web Summary : Rumali roti, popular today, surprisingly originated in the Mughal era not as food, but to absorb excess oil and handle food. It was also used like a cloth for cleaning and covering food. Originating in Punjab, it's now a culinary favorite.