चोरी करण्यासाठी गेला अन् महिलेच्या पडला प्रेमात, पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:52 PM2023-06-28T12:52:50+5:302023-06-28T12:54:24+5:30

अमेरिकेच्या इंडियानापॉलिसमध्ये गेल्या 8 मे रोजी एक अजब घटना घडली. इथे एंबर बेरॉन नावाची एक महिला राहते. एक दिवस एंबर आपल्या कामाहून उशीरा घरी परतली.

Robber mugged woman fall in love and ask her to go for date | चोरी करण्यासाठी गेला अन् महिलेच्या पडला प्रेमात, पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

चोरी करण्यासाठी गेला अन् महिलेच्या पडला प्रेमात, पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

दररोज जगभरातून चोरीच्या अजब अजब घटना समोर येत असतात. कुठे चोरांच्या हाती मोठा माल लागतो तर कुठे ते फक्त जेवण करून बाहेर पडतात. पण एखादा चोर चोरी करायला गेला आणि महिलेला पाहून तिच्या प्रेमात पडला अशी घटना तुम्ही कधी ऐकली नसेल. मात्र, अमेरिकेतील एका चोरासोबत असं झालं. तो महिलेला लुटण्यासाठी गेला, पण तिच्या प्रेमात पडला.

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या इंडियानापॉलिसमध्ये गेल्या 8 मे रोजी एक अजब घटना घडली. इथे एंबर बेरॉन नावाची एक महिला राहते. एक दिवस एंबर आपल्या कामाहून उशीरा घरी परतली. घरी आल्यावर घराबाहेरच्या मेलबॉक्समध्ये ती लेटर चेक करत होती. तेव्हाच एक चोर पिस्तुल घेऊन आला आणि तिला पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी करू लागला.

एंबरकडे तेव्हा 100 डॉलर होते जे घाबरून तिने चोराला दिले. पण पैसे घेतल्यावरही चोर काही तिथून गेला नाही. पुन्हा त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत तिला तिच्या फोनवर फेसबुक उघडण्यास सांगितलं. यानंतर त्याने तिच्या अकाउंटवरून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सांगितली. 

या चोराचं नाव डेमियन बोएस आहे. एंबरला वाटलं की, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर तो तिला तिथे सोडून निघून जाईल. डेमियन त्यानंतर तिथून गेला खरा पण नंतर त्याने एंबरला फेसबुक मेसेज पाठवणं सुरू केलं. 

एका मेसेजमध्ये एंबरला सांगितलं की, तो तिच्या प्रेमात पडला आणि ती त्याला खूप आवडते. तो तिला म्हणाला की, त्याला तिचे पैसे परत करायचे आहेत. एंबरला आनंद झाला की, चोराचं हृदय परिवर्तन झालं. मग त्याने तिला मेसेज केला की, तो वाईट माणूस नाहीये आणि त्याला तिच्यासोबत डेटवर जायचं आहे. 

जे वाचून एंबर हैराण झाली. तिने त्याला मेसेज केला की, ती असं करू शकत नाही. कारण तिचा एक पार्टनर आहे. या घटनेमुळे एंबर जरा घाबरलेली आहे. तिला घराबाहेर निघणं सुरक्षित वाटत नाहीये. दरम्यान चोराला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Robber mugged woman fall in love and ask her to go for date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.