बॉयफ्रेंडकडून दरमहा 80 लाख रुपये 'सॅलरी' घेणारी गर्लफ्रेंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:06 IST2022-04-07T17:04:45+5:302022-04-07T17:06:35+5:30
Georgina Rodriguez : एका रिपोर्टनुसार, रोनाल्डो आपल्या प्रेयसीला खर्चासाठी दरमहा 80 लाखांहून अधिक रुपये देतो. ब्रिटिश मीडियाने गर्लफ्रेंडला दिलेल्या पैशाचे वर्णन 'सॅलरी' असे केले आहे.

बॉयफ्रेंडकडून दरमहा 80 लाख रुपये 'सॅलरी' घेणारी गर्लफ्रेंड!
प्रसिद्ध फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. खेळाव्यतिरिक्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. यावेळी तो पुन्हा एकदा त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जमुळे (Georgina Rodriguez) चर्चेत आला आहे. एका रिपोर्टनुसार, रोनाल्डो आपल्या प्रेयसीला खर्चासाठी दरमहा 80 लाखांहून अधिक रुपये देतो. ब्रिटिश मीडियाने गर्लफ्रेंडला दिलेल्या पैशाचे वर्णन 'सॅलरी' असे केले आहे.
El Nacional च्या मते, जॉर्जिना रॉड्रिग्जला 'मुलांच्या संगोपणासाठी आणि इतर खर्चासाठी' दरमहा 83,000 पौंड (82 लाखांपेक्षा जास्त) दिले जातात. याआधी रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला दीड कोटींची कार गिफ्ट केली होती. रोनाल्डो आणि जॉर्जिना आलिशान जीवनशैली जगतात. याची झलक जॉर्जिनाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळते. जॉर्जिना आणि रोनाल्डो 2017 पासून एकत्र आहेत.
दरम्यान, जॉर्जिना ही व्यवसायाने मॉडेल आहे. अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. इंस्टाग्रामवर तिचे 36 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लोक लाईक आणि कमेंट करतात. अलीकडेच जॉर्जिनावर बनवलेल्या 'I Am Georgina' या माहितीपटात तिच्या आयुष्यातील सर्व पैलूंवर भाष्य करण्यात आले आहे.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, एकेकाळी स्टोअरमध्ये काम करणाऱ्या जॉर्जिनाचे आयुष्य रोनाल्डोसोबत गेल्यानंतर पूर्णपणे बदलून गेले. जॉर्जिना 48 कोटींच्या आलिशान महालात राहते. 55 कोटींच्या Yacht मध्ये प्रवास करते, तसेच Bugatti, Rolls-Royces आणि Ferrari सारख्या लक्झरी कारमध्ये प्रवास करते. त्यांच्या महालात स्विमिंग पूल, जिम आणि फुटबॉल ग्राउंड देखील आहे. रिपोर्टनुसार, ती विमान प्रवासासाठी प्रायव्हेट जेटचा वापर करते.