रिटायर्ड वैज्ञानिकाने शोधला १४व्या शतकातील खजिना, लिलावात मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:31 IST2022-03-15T15:31:01+5:302022-03-15T15:31:31+5:30
Treasure Found : लंडनच्या मेफेअरमध्ये एका लिलावात या आठवड्यात एक दुर्मीळ सोन्याचं नाणं विकण्यात आलं. या लिलावातील किंमत वाचून तुम्ही अवाक् व्हाल.

रिटायर्ड वैज्ञानिकाने शोधला १४व्या शतकातील खजिना, लिलावात मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्
सोन्याचं नाणं सामान्यपणे महागच असतं. पण याची किंमत अधिक तेव्हा वाढते जेव्हा हे नाणं दुर्मीळ आणि प्राचीन असेल. लंडनच्या मेफेअरमध्ये एका लिलावात या आठवड्यात एक दुर्मीळ सोन्याचं नाणं (Rare Gold Coin) विकण्यात आलं. या लिलावातील किंमत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. या छोट्याशा नाण्याला 'लेपर्ड' कॉइन नावाने ओळखलं जातं.
असं सांगितलं जातं की, हे नाणं १४व्या शतकातील आहे. डिक्स नूनन वेब संस्थेनुसार, मंगळवारी हे नाणं एका ब्रिटीश ग्राहकाने खरेदी केलं. तेच ब्रिटनच्या नॉरफॉकध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय रिटायर्ड रिसर्च सायंटिस्ट एंडी कार्टरने हे नाणं शोधलं होतं. कार्टर म्हणाले की, चार वर्षाआधी रिटायर्ड झाल्यानंतर ते नेहमीच त्यांचं मेटल डिटेक्टर घेऊन बाहेर जात होते. एका शेतात ३० इतर संशोधकांसोबत ते शोध घेत असताना त्यांना हे नाणं सापडलं होतं.
या नाण्याबाबत कार्टर यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी हे नाणं शोधलं तेव्हा ते स्तब्ध झाले होते. त्यानंतर ते आनंदाने नाचू लागले होते आणि गोल्ड डान्स करू लागले होते. कार्टर म्हणाले की, भाग्यशाली होतो की, हे नाणं शोधू शकलो. कार्टर म्हणाले की, त्यावेळी केवळ तीन लोकंच शोध घेत होते. तर इतर लोक तेथून जाण्याची तयारी करत होते. हे नाणं जमिनीखाली १० इंचावर गाडलं गेलं होतं आणि पूर्णपणे मातीने वेढलेलं होतं.
जेव्हा त्यांनी माती साफ केली तेव्हा मांजरीचा एक मोठा पाय दिसला. त्यांनी विचार केला की, हा बिबट्या नसू शकतो कारण ते फार दुर्मीळ असतात. यानंतर कार्टरने एका तज्ज्ञासोबत चर्चा केली तेव्हा समजलं की नाण्यावर दिसणारी आकृती ही एका बिबट्याचीच आहे. तो एक बॅनर घालून सरळ बसलेला दिसतो.
या नाण्याबाबत लिलाव करणाऱ्या संस्थेने सांगितलं की, नाणं जानेवारी १३४४ काळातील आहे. जे केवळ ७ महिन्यांपर्यंतच चलनात होतं. हे नाणं फारच चांगल्या अवस्थेत आहे. तेच खास बाब ही आहे की, अशाप्रकारची नाणी केवळ पाचच तयार करण्यात आली होती. याच कारणाने या नाण्याला लिलावात तब्बल १४०,००० पाउंट म्हणजे १.४० कोटी रूपये मिळाले.