हृदयद्रावक! मुलाला रात्री नदीवर जाणं पडलं महागात, सहाव्या दिवशी सापडला मगरीच्या पोटात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:19 IST2020-08-04T15:05:52+5:302020-08-04T15:19:59+5:30
ही घटना आहे मलेशियातील. इथे १४ वर्षाच्या एका मुलाला मगरीने आपली शिकार केलं. या मगरीच्या पोटातून मुलाच्या शरीराचे अनेक अवयव काढण्यात आले.

हृदयद्रावक! मुलाला रात्री नदीवर जाणं पडलं महागात, सहाव्या दिवशी सापडला मगरीच्या पोटात!
अपघात कधीही कुठेही घडतात. आपल्या माहीतही नसतं की, पुढील क्षणी काय होणार आहे. कधी कुणी विचार केलेला नसतो की, पुढील काही मिनिटांमध्ये त्यांचा मृत्यु होईल. मलेशियातील एक १४ वर्षाच्या मुलाने कधी विचारही केला नसेल की, रात्रीच्या जेवणासाठी शिंपले पकडणं त्याच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरेल.
नदी किनारी शिंपले पकडण्यासाठी गेलेला १४ वर्षीय मुलगा ६ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर ६ दिवसांनी त्याचा पत्ता लागला. लोकांनी या मुलाला १४ फूट मगरीच्या पोटातून बाहेर काढले. याचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
ही घटना आहे मलेशियातील. इथे १४ वर्षाच्या एका मुलाला मगरीने आपली शिकार केलं. या मगरीच्या पोटातून मुलाच्या शरीराचे अनेक अवयव काढण्यात आले. १४ वर्षीय मुलाचं नाव रिकी गांया असं होतं. शुक्रवारी तो नदी किनारी रात्रीच्या जेवणासाठी शिंपले पकडण्यासाठी गेला होता. तेव्हाच मगरीने त्याचा पाय जबड्यात पडकला आणि त्याची शिकार केली.
मलेशियातील रूमहमध्ये राहणाऱ्या रिकीचा गेल्या ६ दिवसांपासून शोध घेतला जात होता. अखेर एका कोंबडीची शिकार करण्यासाठी मगर ६ दिवसांनी बाहेर आली. तेव्हा रिकीला शोधण्यात यश आलं. रिकीला मगरीने २६ जुलैलाच खेचून नेलं होतं. त्यानंतर मगरीने त्याला खाल्लं. ६ दिवसांनी मगरीला पुन्हा भूक लागली तेव्हा ती बाहेर आली. रेस्क्यू टीमने मगरीला पकडलं. मगर इतकी मोठी होत की, तिला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.
रेस्क्यू टीमला मगरीच्या पोटात मनुष्याचे बॉडी पार्ट्स आढळून आले. मगरीचं पोट फाडून सर्व पार्ट्स बाहेर काढण्यात आलेत. यानंतर हे बॉडी पार्ट्स त्याच्या परिवाराकडे सोपवले गेले. त्यावर त्यांनी अंत्यसंस्कार केले. एका महिलेने मगर या मुलाला खेचून नेताना पाहिलं होतं. त्यानंतर ६ दिवस लोक तिचा शोध घेत होते.
हे पण वाचा :
बाबो! तिखट मिरचीचे मोमोज खाणं पडलं महागात, पोटात झाला स्फोट आणि...
बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर