रेल्वे रूळावर सुसाट धावत असताना 'खक-खक' असा आवाज कुठून येतो? आवाज ओळखीचा असेल पण माहीत नसेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:46 IST2026-03-13T16:43:35+5:302026-03-13T16:46:25+5:30

Railway Interesting Facts : जेव्हा रेल्वे ट्रॅकवर सुसाट धावत असते तेव्हा खट-खट असा आवाज कुठून येतो? हा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा असतो, पण तो येतो कुठून हे अनेकांना माहीत नसतं. 

Railway Interesting Facts : Where does the thak thak sound come from when a train is moving | रेल्वे रूळावर सुसाट धावत असताना 'खक-खक' असा आवाज कुठून येतो? आवाज ओळखीचा असेल पण माहीत नसेल उत्तर

रेल्वे रूळावर सुसाट धावत असताना 'खक-खक' असा आवाज कुठून येतो? आवाज ओळखीचा असेल पण माहीत नसेल उत्तर

Railway Interesting Facts : रेल्वेचा प्रवास हा फक्त एक-दोन नाही तर कितीतरी अनुभव देणारा असतो. फक्त माणसाने डोळे आणि कान उघडे ठेवायला हवे. जर असं केलं तर अनेक नवीन गोष्टी बघायला मिळतात आणि अनेक नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. इतकंच नाही तर काही गोष्टींवरून आपल्या मनात अनेक प्रश्नही निर्माण होतात. आपणही अनेकदा रेल्वे प्रवास करताना असं काही अनुभवलं असेल किंवा एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला प्रश्न पडला असेलच. अशाच प्रश्नांपैकी एक प्रश्न असू शकतो तो म्हणजे जेव्हा रेल्वे ट्रॅकवर सुसाट धावत असते तेव्हा खट-खट असा आवाज कुठून येतो? हा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा असतो, पण तो येतो कुठून हे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ या वेगळ्या प्रश्नाचं उत्तर... 

आवाज सगळ्यांनाच ऐकू येतो, पण कशाचा असतो?

भारतात क्वचितच एखादी अशी व्यक्ती असेल ज्याने रेल्वेने प्रवास केला नसेल. आता ज्यांनी ज्यांनी रेल्वे प्रवास केला असेल त्यांना एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल की, जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा थोड्या थोड्या अंतराने खट-खट, खट-खट असा आवाज ऐकू येतो. जे लोक नियमितपणे रेल्वेने प्रवास करतात, त्यांनी या आवाजाला रेल्वेचाच भाग मानलं असेल. पण असं अजिबात नाहीये. मग हा आवाज कशाचा असतो, कुठून येतो? तेच जाणून घेऊ.

कशाचा असतो हा आवाज?

आपल्याला माहीत आहेच की, रेल्वे खूप मोठं अंतर पार करत असतात. पण तेवढा लांब ट्रॅक बनवणं शक्य नाही. त्यामुळे भारतात एका फिक्स लांबीचा ट्रॅक बनवला जातो, जो सामान्यपणे १३ मीटर लांब असतो. असेच कितीतरी ट्रॅक जोडून एक अख्खा ट्रॅक बनवला जातो. आता जेव्हाही दोन ट्रॅक जोडले जातात, तेव्हा तिथे थोडासा गॅप राहतो. आता होतं असं की, जेव्हाही रेल्वे त्या ट्रॅक जोडण्यात आलेल्या जॉइंटच्या पॉइंटवरून जाते, तेव्हा तिथून हा खट - खट आवाज येतो. हा आवाज ट्रॅक आणि चाकांच्या खडबडीत पृष्ठभागामुळे आणि घर्षणामुळे निर्माण होतो. आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल की, हा आवाज कुठून येतो.

Web Title : रेलवे ट्रैक की खड़खड़: लयबद्ध ध्वनि का स्रोत जानें

Web Summary : क्या आपने कभी ट्रेन की पटरियों पर 'खड़खड़' की आवाज के बारे में सोचा है? यह ट्रेन के पहियों द्वारा ट्रैक के खंडों के बीच के अंतर को हिट करने से उत्पन्न होती है, आमतौर पर 13-मीटर लंबाई छोटे स्थानों के साथ जुड़ी होती है। यह प्रभाव और घर्षण परिचित लयबद्ध शोर पैदा करते हैं।

Web Title : Railway Track Clatter: Discover the Source of the Rhythmic Sound

Web Summary : Ever wondered about the 'clack-clack' sound on train tracks? It arises from train wheels hitting gaps between track sections, typically 13-meter lengths joined with small spaces for expansion. This impact and friction create the familiar rhythmic noise.