अजबच! एका मुंगीची किंमत २१ हजार, इतक्या मुंग्यांचे काय करतात तस्कर?; जीवशास्त्रज्ञही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:28 IST2026-03-30T14:26:27+5:302026-03-30T14:28:23+5:30

गेल्या वर्षी नैवाशा येथील एका गेस्टहाऊसमध्ये ५,००० जायंट हार्वेस्टर राणी मुंग्या जिवंत पकडल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

queen ant smuggling: An ant costs 21 thousand, what do smugglers do with so many ants?; Biologists are also surprised | अजबच! एका मुंगीची किंमत २१ हजार, इतक्या मुंग्यांचे काय करतात तस्कर?; जीवशास्त्रज्ञही हैराण

अजबच! एका मुंगीची किंमत २१ हजार, इतक्या मुंग्यांचे काय करतात तस्कर?; जीवशास्त्रज्ञही हैराण

केनियामध्ये सध्या मुंग्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात गिलगिल नावाच्या एका लहान शहराच्या आसपास हजारो वारुळांमधून शेकडो मुंग्या बाहेर पडताना दिसतात. हा परिसरात केनियातील रिफ्ट वॅली भागात आहेत जिथे बेकायदेशीर कामांचे केंद्र बनले आहे. या वातावरणात नर मुंग्यांना पंख येतात आणि राणी मुंगीसोबत मिलनासाठी ते उडतात. राणी मुंगीही त्याचवेळी उडते. हीच ती वेळ असते जेव्हा लोक राणी मुंगीला पकडून त्याची तस्करी करून बाजारात विकतात.

जगभरात एक मोठा काळा बाजार आहे जिथे लोक छंद म्हणून काचेच्या पेट्यांमध्ये मुंग्या पाळतात आणि त्यांना त्यांची घरे बांधताना पाहतात. सर्वाधिक मागणी असलेली राणी मुंगी म्हणजे 'लार्ज आफ्रिकन हार्वेस्टर' आहे. ती आकाराने मोठी आणि लाल रंगाची असते. ऑनलाइन चालणाऱ्या काळ्या बाजारात एका राणी मुंगीला २२० डॉलर्स म्हणजेच सुमारे २१,००० रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते. एक गर्भवती राणी मुंगी संपूर्ण वसाहत तयार करू शकते आणि अनेक वर्षे जगू शकते. तिची वाहतूक करणेही सोपे आहे कारण विमानतळावरील स्कॅनर सहसा जिवंत मुंग्या ओळखत नाहीत.

तर नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले की, सुरुवातीला हे बेकायदेशीर आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. मी पूर्वी परदेशी खरेदीदारांना स्थानिक मुंगी पकडणाऱ्यांशी जोडणारा मध्यस्थ म्हणून काम करत असे. या मुंग्यांचे वैज्ञानिक भाषेतील मेसर सेफॅलोटेस (Messor cephalotes) आहे. त्या पूर्व आफ्रिकेत आढळतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या बिया गोळा करतात म्हणूनच मुंग्या पाळणाऱ्या उत्साही लोकांमध्ये त्यांना मोठी मागणी आहे. एका मित्राने मला सांगितले, एक परदेशी माणूस राणी मुंग्यांसाठी चांगले पैसे देत होता, ज्या इथे सहज मिळतात असं त्याने सांगितले.

दरम्यान, आम्ही पहाटे सूर्योदयापूर्वी मोकळ्या शेतांजवळ वारूळ शोधायचो. ते परदेशी लोक स्वतः कधीच शेतांवर येत नसत. ते शहरातील गेस्ट हाऊसमध्ये किंवा गाड्यांमध्ये राहायचे. ते देत असलेल्या लहान नळ्या आणि सिरिंजमध्ये आम्ही मुंग्या भरून त्यांना पोहोचवायचो असं त्या माणसाने सांगितले. गेल्या वर्षी नैवाशा येथील एका गेस्टहाऊसमध्ये ५,००० जायंट हार्वेस्टर राणी मुंग्या जिवंत पकडल्या गेल्यावर केनियामधील या अवैध व्यापाराचे खरे स्वरूप उघडकीस आले. केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिसनुसार यातील पकडले गेलेले संशयित बेल्जियम, व्हिएतनाम आणि केनिया येथील होते. त्यांनी ओल्या कापसाने भरलेल्या टेस्ट ट्यूब आणि सिरिंजमध्ये मुंग्या ठेवल्या होत्या. प्रत्येक मुंगी दोन महिन्यांपर्यंत जगू शकत होती. त्यांना युरोप आणि आशियामध्ये नेऊन विकण्याची योजना होती.

मुंग्याच्या वापराने अनेकजण हैराण

या मुंग्यांच्या व्यापाराने शास्त्रज्ञ आणि अधिकारी दोघांनाही गोंधळात टाकले आहे. केनियामध्ये हस्तिदंत आणि गेंड्याच्या शिंगांच्या तस्करीची मोठी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत पण मुंग्यांच्या तस्करीची शक्यता कोणीही कधीच कल्पना केली नव्हती. 'अँट्स आर अस' नावाचे एक ब्रिटिश दुकान या मुंगीला लोकांची स्वप्नातील प्रजाती" म्हणते. राणी मुंग्या शोधण्यात येणाऱ्या अडचणींमुळे त्या सध्या त्यांच्या दुकानात उपलब्ध नाहीत. केनियामध्ये मुंग्यांच्या जवळपास ६०० प्रजाती आढळतात. 

राणी मुंगी अनेक नर मुंग्यांसोबत मिलन करते. त्यानंतर नर मुंग्यांचे काम संपते. त्यापैकी बहुतेक भक्षकांकडून खाल्ले जातात किंवा मरतात. मग राणी मुंगी एक लहान बोगदा खणते आणि अंडी घालून आपलं वारूळ बांधायला सुरुवात करते. एक कॉलनी ५० ते ७० वर्ष जिवंत राहू शकते. राणी मुंगीही तितकाच काळ जगते. एकदा राणी मुंगी मेली तर संपूर्ण कॉलनी विखुरते असं जीवशास्त्रज्ञ डिनो मार्टिन्स सांगतात. 

Web Title : दुर्लभ चींटी 220 डॉलर में बिकी; अवैध व्यापार से केन्याई वैज्ञानिक हैरान।

Web Summary : केन्या में अवैध व्यापार में रानी चींटियाँ ऊँची कीमतों पर बिक रही हैं, जो 220 डॉलर तक हैं। तस्कर विश्व स्तर पर उत्साही लोगों के लिए 'लार्ज अफ्रीकन हार्वेस्टर' चींटियों को लक्षित करते हैं। ये चींटियाँ काले बाजार में बेची जाती हैं।

Web Title : Rare ant fetches $220; illegal trade shocks Kenyan scientists.

Web Summary : Kenyan illegal trade exposes queen ants fetching high prices, up to $220. Smugglers target 'large African harvester' ants for enthusiasts globally. These ants are sold into the black market.