या फोटोत दडली आहेत किती वर्तुळं? जो शोधेल त्याची नजर फारच तीक्ष्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 19:11 IST2022-05-01T19:08:07+5:302022-05-01T19:11:57+5:30
हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचे योग्य उदाहरण आहे. हा फोटो एका दरवाजाचा आहे. ज्यावरील डिझाइन ही चौकोनी दिसत आहे. परंतु असे असले, तरी या फोटोमध्ये वर्तुळं देखील लपलेली आहेत.

या फोटोत दडली आहेत किती वर्तुळं? जो शोधेल त्याची नजर फारच तीक्ष्ण
ऑप्टिकल इल्युजन संदर्भात अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो खरंतर सगळ्यांच्या तीक्ष्ण नजरेची चाचणी घेतात. तसेच आपल्या मेंदूला चालना देतात. आपलं डोकं दररोजचं तेचं, तेचं काम करत असतं, त्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळण्यासाठी असे फोटो काम करतात. हे फोटो असे असतात, की एका नजरेत आपल्याला त्या फोटोत नक्की काय लपलंय हे कळत नाही. सध्या व्हायरल होणारा फोटो हा देखील तसाच आहे.
हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचे योग्य उदाहरण आहे. हा फोटो एका दरवाजाचा आहे. ज्यावरील डिझाइन ही चौकोनी दिसत आहे. परंतु असे असले, तरी या फोटोमध्ये वर्तुळं देखील लपलेली आहेत.
चौकोन डिझाइन असलेल्या या दरवाजामध्ये १६ वर्तुळ लपलेले आहेत. जी तुम्हाला शोधून दाखवायचं आहे. पाहा तुम्हाला ते दिसलं का? फोटो पहिल्याच नजरेत पहाता यामध्ये एकही वर्तुळ लपलेलं आपल्याला दिसत नाही. परंतु नीट पाहाल तर यामध्ये १६ वर्तुळ खरंच लपलेली आहेत.
पाहा इथे आहेत १६ वर्तुळं
तुम्ही बराच वेळ फोटोकडे पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, या चौरस किंवा आयताकृती फोटोंमध्ये वर्तुळं कुठे लपली आहेत