'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:32 IST2022-02-21T17:31:33+5:302022-02-21T17:32:09+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू-अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे.

Pushpa Movie Tom and Jerry version has gone viral on social media | 'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू-अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे. सोशल मीडियावर युझर्स पुष्पाचे डायलॉग्ज आणि गाण्यांवर रिल्स तयार करुन शेअर करत आहेत. पुष्पा सिनेमातील गाण्यांची अनेक व्हर्जन्स देखील खूप लोकप्रिय झाली. आता त्यात टॉम अँड जेरी व्हर्जनची भर पडली आहे. हे व्हर्जन पाहून तुम्हीही पोट धरून हसाल इतकं नक्की. 

पुष्पा सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांवर एडिट केले जाणारे अनेक विनोदी व्हर्जन्सचा लोक आनंद घेत आहेत. त्यात आता टॉम अँड जेरीच्या व्हर्जननं मोठी भर घातली आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा असून ४ लाखाहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओ मिळाले आहेत. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लोकप्रिय कार्टुन सीरिज टॉम अँड जेरीमधील टॉम चक्क श्रीवल्ली गाण्याच्या हूक स्टेप करताना दिसतो. तसंच सामी-सामी गाण्यावरही थिरकताना पाहायला मिळतो. जर जेरी देखील काही मागे राहिलेला नाही. अल्लू अर्जुनच्या खास स्टाइलची जेरी कॉपी करताना दिसतो. खरंतर टॉम अँड जेरी कार्टुनचं हे काही नवं व्हर्जन नाहीय. कार्टुनमधील याआधीच्याच सीनचा वापर करुन ते पुष्पा गाण्यातील व डायलॉग्सशी मिळतंजुळतं एडिट केलं आहे. 

पाहा पुष्पा स्टाइल टॉम अँड जेरीचा धमाल व्हिडिओ...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ Edits MukeshG नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक जणांनी व्हिडिओ लाइक केला असून संख्या वाढत जात आहे. 

Web Title: Pushpa Movie Tom and Jerry version has gone viral on social media