VIDEO- इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 13:47 IST2018-02-13T13:46:19+5:302018-02-13T13:47:49+5:30

मित्राशी डोळ्यांच्या भाषेत बोलताना प्रिया पाहायला मिळते आहे.

priya prakash varrier winking her eyes in new video posted for fans says thanks for the love | VIDEO- इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार

VIDEO- इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार

मुंबई- इंटरनेटवर रातोरात स्टार बनलेल्या प्रिया प्रकाश या नवोदित अभिनेत्रीने तिच्या अंदानी सगळ्यांनाचा घायाळ केलं आहे. प्रियाच्या डोळ्यांनी व तिच्या भूवयांच्या अदाकारीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रिया प्रकाश मल्याळम सिनेमा 'ओरू अदार लव'मधील 'मलरया पूवी'मध्ये दिसते आहे. मित्राशी डोळ्यांच्या भाषेत बोलताना प्रिया पाहायला मिळते आहे. संपूर्ण गाण्यात प्रिया फक्त 30 सेकंद स्क्रीनवर दिसते. या काही सेकंदामध्ये ती तिचे डोळे उघड झाप करते तसंच भुवयाही उडवताना दिसते. डोळे व भुवयांची अदाकारी करताना तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं आहे. प्रियाच्या या एक्स्प्रेशने सोशल मीडियावर तरूणाईला घायाळ केलं आहे. 
प्रियाच्या या व्हिडीओला इंटरनेटवर मिळालेला धमाकेदार प्रतिसाद पाहून प्रियाने तिच्या सगळ्या फॅन्सचे अनोख्या अंदाजात आभार मानले आहेत. प्रियाने तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले. या व्हिडीओत प्रिया हसऱ्या चेहऱ्याने भुवया उडविताना दिसते आहे. 

मला इतकं प्रेम व पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही. पण मी तुमच्यापर्यंत पोहचण्याचा नक्की प्रयत्न करीन, तोपर्यंत तुम्ही असंच प्रेम देत राहा, असं कॅप्शन प्रियाने व्हिडीओ पोस्ट करताना दिलं आहे. 



 

फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात
इन्स्टाग्रामवर प्रियानं अनेक दिग्गजांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रिया प्रकाश वारियरला एका दिवसात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.  यासहीत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणा-या सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया आता अमेरिकेची मॉडेल काइली जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत पोहोचली आहे.  जेनर आणि ख्रिस्तियानो या दोघांच्याही नावावर केवळ एका दिवसात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्संची संख्या वाढल्याचा रेकॉर्ड आहे. अमेरिकीची मॉडेल काइली जेनरला एक दिवसात 8 लाखांहून अधिक तर ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक दिवसात साडेसहा लाख लोकांनी इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.  

Web Title: priya prakash varrier winking her eyes in new video posted for fans says thanks for the love