सिरीअल पूपर! पार्कमध्ये जागोजागी शौच करणाऱ्या महिलेला अटक, अनेक प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 17:48 IST2021-07-24T17:47:03+5:302021-07-24T17:48:32+5:30
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी एका अशा महिलेचा पर्दाफाश केलाय जी शहरात सकाळी फिरायला जाते तेव्हा लॉनवर शौच करते.

सिरीअल पूपर! पार्कमध्ये जागोजागी शौच करणाऱ्या महिलेला अटक, अनेक प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात
इंडियानाच्या फिशर्समध्ये पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणांवर विचित्र वागणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. महिलेवर आरोप आहे की, ती शहरात सकाळी-सकाळी फिरायला जाते तेव्हा शेजारच्या लॉनसहीत वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरत फिरत शौच करत होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी एका अशा महिलेचा पर्दाफाश केलाय जी शहरात सकाळी फिरायला जाते तेव्हा लॉनवर शौच करते. अधिकारी म्हणाले की, महिलेला केसमध्ये अनेक आरोपांचा सामना करावा लागू शकतो. शहरातील अनेक लोकांनी स्थानिक ब्रॉडकास्टर डब्ल्यूटीएचआरसोबत सीरिअल पूपरबाबत(ठिकठिकाणी शौच करणारी) सांगितलं होतं.
फिशर येथे राहणारी एंजी केलीने स्थानिक मीडियाला सांगितलं की, 'आम्ही तिला द पूपर म्हणतो. आमच्याकडे तिच्या बरीच नावे आहेत'. गेल्या आठवड्यात किंवा त्याच्या आधीच्या आठवड्यात रस्त्याच्या बाजूला तीन ते चार ठिकाणी शौच करून ठेवली.
केली म्हणाली की, ती शिष्टाचाराचं पालन करत नाही. शेजारी मोनिक मिलर म्हणाला की, 'आम्हाला आमच्या यार्डात तिने केलेली घाण दिसली. महिला तिचा टॉयलेट पेपर घेऊन जाते आणि टॉयलेट पेपर तसाच घाणीसोबत सोडून जाते'. विंडमेअरचे शेजारी लोकांनी या महिलेला जागोजागी घाण करण्यापासून रोखण्याचा अनेक प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. त्यांनी तिची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक दिवस घालवले. त्यानंतर त्यांनी प्रायव्हेट गुप्तहेराची मदत घेतली. तेव्हा ती पकडली गेली.