शोधाल तर सापडेल! फोटो आहे बेडकाचा पण यात लपलाय घोडा, पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:31 IST2022-04-26T15:27:48+5:302022-04-26T15:31:48+5:30

एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सगळ्यांच्याच डोळ्यांना धोका देत आहे.

photo of frog but horse is hidden in it know what it says about your personality | शोधाल तर सापडेल! फोटो आहे बेडकाचा पण यात लपलाय घोडा, पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

शोधाल तर सापडेल! फोटो आहे बेडकाचा पण यात लपलाय घोडा, पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

सोशल मीडियावर आपल्याला आपल्या आवडीचे अनेक कन्टेन्ट पाहायला मिळतात. हे व्हिडीओ किंवा फोटो आपलं मनोरंजन करतात. या प्लॅटफॉर्मवरती आपल्या अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो समोर येतात. जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि आपल्या मेंदूला चालना देतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सगळ्यांच्याच डोळ्यांना धोका देत आहे.

व्हायरल होणारा फोटो हा एका बेडकाचा दिसत आहे. परंतु हा फोटो शेअर करताना त्यामध्ये घोडा शोधून दाखवा असे चॅलेंज दिले गेले आहे. ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोमध्ये तुम्ही पाहिलात तर पेन्सीलने काढल्यासारखं हे बेडकाचं चित्र आहे. ज्यावर आपल्याला तो बेडूक पानावर बसलेला दिसत आहे. परंतु तुम्हाला हा फोटोपाहून बेडूक जरी दिसत असला तरी या फोटोमध्ये घोडा लपला आहे.

आता थोडा विचार करा आणि पाहा तुम्हाला यामध्ये घोडा दिसतंय की आणखी काही.....
ऑप्टीकल इल्यूजनचं हे चॅलेंज स्वीकारणं तसं सोप नाही, यासाठी लोकांना बराच विचार करावा लागणार आहे. एवढेच काय तर भल्याभल्यांना यामध्ये उत्तर सापडत नाही. तुम्हाला जर याचं उत्तर सापडलं, तर तुम्ही हुशार आहात असं समजा. पण तुम्हाला जर उत्तर मिळालं नाही तरी काळजी करु नका. आम्ही तुम्हाला यामधील घोडा शोधायला मदत करु. 

पाहा इथे लपलाय घोडा

आता तुम्हाला याचं उत्तर लक्षात आलंय ना? मग तुमच्या मित्रांना हा फोटो शेअर करा आणि पाहा त्यांना उत्तर शोधता येतंय का?

 

Web Title: photo of frog but horse is hidden in it know what it says about your personality