आता या देशातही व्हिसाशिवाय जाऊ शकतील भारतीय पर्यटक, जाणून तेथे 100 रूपये किती होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:48 IST2025-05-31T13:48:04+5:302025-05-31T13:48:36+5:30

Visa Free Entry : आता नव्याने भारतीयांसाठी व्हिसा फ्री असणाऱ्या एका देशाच या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Philippines announce visa free entry policy for Indians | आता या देशातही व्हिसाशिवाय जाऊ शकतील भारतीय पर्यटक, जाणून तेथे 100 रूपये किती होतील

आता या देशातही व्हिसाशिवाय जाऊ शकतील भारतीय पर्यटक, जाणून तेथे 100 रूपये किती होतील

Visa Free Entry : जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय लोक व्हिसाशिवायही जाऊ शकतात. भूतान, नेपाळ, श्रीलंका या भारताला लागून असलेल्या भारतापासून जवळ असलेल्या मलेशिया देशात जाण्यासाठी भारतीय लोकांना व्हिसाची गरज पडत नाही. यात इतरही काही देशांचा समावेश आहे. आता नव्याने भारतीयांसाठी व्हिसा फ्री असणाऱ्या एका देशाच या यादीत समावेश करण्यात आला आहे.

फिलीपिन्सला जाण्यासाठी तुम्हाला आता व्हिसाची गरज पडणार नाही. नवी दिल्लीतील फिलीपिन्स दूतावासाकडून अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानं भारतीय पर्यटकांना आता आधीपेक्षा अधिक सुविधा मिळतील. फ्री व्हिसाद्वारे केवळ पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनाच परवानगी मिळेल. याशिवाय एखाद्या दुसऱ्या कारणासाठी जायचं असेल तर ई-व्हिसा माध्यमातून जावं लागेल.

14 दिवसांची फ्री-व्हिसा एंट्री

भारतीय पासपोर्ट असल्यास केवळ पर्यटनासाठी कुणीही केवळ 14 दिवसांसाठी विना व्हिसा फिलीपिन्समध्ये जाऊ शकतात. यादरम्यान दिवस वाढवले जाणार नाहीत आणि ना व्हिसासंबंधी इतर कोणतीही सुविधा दिली जाणार. 14 दिवसांसाठी सगळ्याच मुख्य विमानतळं, बेट आणि क्रुज टर्मिनलवर प्रवेशाची परवानगी असेल.

अटी

उद्देश केवळ पर्यटन असावा

पासपोर्ट प्रवासासाठी सहा महिन्यांसाठी वैध असावा

फिलीपिन्समध्ये राहण्याच्या ठिकाणाचं बुकिंग, तिकीट दाखवावं लागेल
पुरेसे पैसे बॅंकेत हवेत

100 रूपये फिलीपिन्समध्ये किती होतात?

फिलीपिन्सला फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या लोकांना तेथील करन्सी आणि भारतीय रूपयामधील अंतर, त्याची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. फिलीपिन्समध्ये पेसो करन्सी चालते. तिथे गेल्यावर भारतीय रूपये पेसोमध्ये बदलून घ्यावे लागतात. इथे 100 रूपये म्हणजे 65 पेसो होतात.

Web Title: Philippines announce visa free entry policy for Indians