Coronavirus Effect : ना चहा-कॉफी, ना कोल्ड ड्रिंक; लग्नात दिला आयुर्वेदिक काढा; कोरोनाने सोहळाच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:48 PM2020-06-27T12:48:03+5:302020-06-27T12:56:48+5:30

एकंदर कोरोनामुळे लग्नाच्या रिती-रिवाजांमध्ये मोठा बदल झाला आहे. अशाच एका अनोख्या लग्नाची गोष्टी आम्ही सांगणार आहोत.

Patna : Coronavirus effect in marriage, Kadha replaced tea and coffee | Coronavirus Effect : ना चहा-कॉफी, ना कोल्ड ड्रिंक; लग्नात दिला आयुर्वेदिक काढा; कोरोनाने सोहळाच बदलला!

Coronavirus Effect : ना चहा-कॉफी, ना कोल्ड ड्रिंक; लग्नात दिला आयुर्वेदिक काढा; कोरोनाने सोहळाच बदलला!

Next

(Main Image Credit : yourstory.com)

कोरोना व्हायरसमुळे सगळं काही बदलून गेलंय. चालणं, उठणं, बसणं, बोलणं आणि वागणं या सर्वात बदल झालाय. लग्नांमध्ये तर हा बदल फारच स्पष्टपणे दिसतो. म्हणजे बघा ना मंडपात बसलेल्या नवरदेवाला हळद लावण्याआधी लोकांना हातवर सॅनिटायजर लावलं जात आहे. पुजारीही मास्कही घालूनच मंत्राचा जप करत आहेत. लोकांवर सॅनिटायजर मिश्रित अत्तर शिंपडलं जात आहे. म्हणजे एकंदर कोरोनामुळे लग्नाच्या रिती-रिवाजांमध्ये मोठा बदल झाला आहे. अशाच एका अनोख्या लग्नाची गोष्टी आम्ही सांगणार आहोत.

jagran.com ने दिलेल्या वृत्तानुसार, पाटन्यातील मनेरच्या रामाधार नगरात राहणारे अरूण कुमार यांचा मुलगा डॉ. कुंदन कुमारचं 28 जून रोजी लग्न आहे. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम होता. इथे सगळे पाहुणे मास्क घालून होते आणि घरातील महिलाही मास्क लावूनच मंगल गीत गात होत्या.

(Image Credit : jagran.com)

पत्रिकेवरही छापलं, मास्क घालूनच या...

अरूण कुमार यांनी सांगितले की, 'आम्ही तर लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवरही छापलं की, लग्नाच्या कार्यक्रमात मास्क लावून येणं अनिवार्य आहे. जे लोक मास्क न लावताच समारोहात येतील, त्यांच्यासाठी गेटवर मास्कची व्यवस्था केली आहे. तसेच घरातील आणि वरातीतील पाहुण्यांना सॅनिटाइज करूनच आत मंडपात प्रवेश दिला जाईल.

इव्हेंट कंपनीने सुद्धा केला वेगळा प्लॅन

या लग्नाच्या इव्हेंट कंपनीच्या मॅनेजरने सांगितले की, आधी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर अत्तर शिंपडलं जात होतं आणि कपाळावर टिळा लावत होते. आता अत्तरात सॅनिटायजर मिश्रित करून स्वागत केलं जात आहे. प्लेटमध्ये आधी गुलाबाचे फूल ठेवले जात होते. पण आता मास्क आणि सॅनिटायजरच्या छोट्या छोट्या बॉटल ठेवल्या जात आहेत. ब्युटी पर्लरमध्ये आर्टिस्ट पीपीई किट घालून नवरीला सजवलं जात आहे.

(Image Credit : jagran.com)

मेन्यूही बदलला....

कोरोनामुळे लग्नातील मेन्यूही बदलला आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी सध्या चहा-कॉफी किंवा कोल्ड ड्रिंकऐवजी तुळस, आलं, लवंगपासून तयार केलेला काढा दिला जात आहे. जेवण तयार करणारे लोकही हातात ग्लव्स घालून सगळं काम करत आहेत. जेवणासाठी डिस्पोजल प्लेट्सचा वापर केला जात आहे. जेणेकरून कोरोनाचं संक्रमण रोखलं जाता यावं.

बोंबला! लग्नाची तारीख वाढवण्यास तयार नव्हते घरातील लोक, मुलीने चक्क पळून जाऊन केले लग्न!

बोंबला! बॅण्डबाजासह वरात घेऊन नवरदेव निघाला; अर्ध्या रस्त्यात कोरोना पॉझिटिव्ह आला अन् मग....

Web Title: Patna : Coronavirus effect in marriage, Kadha replaced tea and coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.