कौतुकास्पद! वडीलांची सुरू होती कॅन्सरशी झुंज; अन् पोरानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप

By manali.bagul | Published: December 27, 2020 05:05 PM2020-12-27T17:05:48+5:302020-12-27T17:16:43+5:30

Trending News in Marathi : या मुलाला अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठाची दोन कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे.

Patna abhinav khanna student of patna gets scholarship of 2 crore rupees from university of america | कौतुकास्पद! वडीलांची सुरू होती कॅन्सरशी झुंज; अन् पोरानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप

कौतुकास्पद! वडीलांची सुरू होती कॅन्सरशी झुंज; अन् पोरानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप

Next

इच्छा तेथे मार्ग हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्नांच्या जोरावर काहीही मिळवू शकता. परिस्थितीवर मात करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेल्या अनेक तरूणांची उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. १८ वर्षांच्या तरूणानं अशीच एक कामगिरी केली आहे. या मुलाला अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठाची दोन कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे.

विशेष म्हणजे या मुलाच्या वडिलांना कॅन्सर असल्यानं घरचं वातावरण तणावाचं होतं. अशा स्थितीतही या तरूणानं जिद्दीनं स्कॉलरशिप मिळवली. सोशल मीडियावर या मुलाची कामगिरी वाचून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या मुलाचं नाव अभिनव खन्न असून वय १८ वर्ष आहे.  अभिनव बिहार मधील पाटणाचा रहिवाशी आहे.

लय भारी! वडीलांना मदत करता करता; ९ वी पास पोरानं भंगारापासून बनवली नवी कोरी बाईक

अमेरिकेतील ओहियोमधील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाची (Case Western Reserve University) २  कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. अभिनव या स्कॉलरशिपची तयारी करत असतानाच त्याचे वडील डोलन खन्ना यांना कॅन्सर झाला. त्यांच्या कॅन्सरनं घरातले वातावरण बदललं, तरीसुद्धा याचा आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ न  देता अभिनवने ही कामगिरी केली. 

भारीच! घरच्या चंद्रासाठी चंद्रावर तुकडा; पठ्ठ्यानं लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला दिलं स्पेशल गिफ्ट

अभिनवला ओहियोमधील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली आहे. हे विद्यापीठ अमेरिकेतील आघाडीचं संशोधन विद्यापीठ आहे. याची स्थापना १८२६ साली झाली आहे. या विद्यापीठानं तब्बल १७ नोबेल पुरस्कार विजेते जगाला दिले आहेत.अभिनवला चार वर्षांसाठी २ कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. या स्कॉलरशिपमधून त्याच्या चार वर्षांच्या शिक्षणासह सर्व खर्च होणार आहे.

Web Title: Patna abhinav khanna student of patna gets scholarship of 2 crore rupees from university of america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.