VIDEO : प्रवासादरम्यान रेल्वेत बनवला आपला सिनेमा हॉल, पाहून अवाक् झाले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:28 IST2023-11-21T16:27:21+5:302023-11-21T16:28:32+5:30
Viral Video : यात काही लोक देशी जुगाड करून रेल्वे प्रवासादरम्यान सिनेमा हॉलचा आनंद घेताना दिसत आहेत.

VIDEO : प्रवासादरम्यान रेल्वेत बनवला आपला सिनेमा हॉल, पाहून अवाक् झाले लोक!
Viral Video : रेल्वेचा प्रवास चांगलाच लांबचा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी मोबाइलमध्ये बिझी असतात. कुणी सिनेमा बघतात तर कुणी गेम्स खेळतात. काही लोक पत्ते खेळतात आणि काही झोपतात. सध्या सोशल मीडियावर रेल्वेच्या बोगीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात काही लोक देशी जुगाड करून रेल्वे प्रवासादरम्यान सिनेमा हॉलचा आनंद घेताना दिसत आहेत.
म्हणजे हे लोक चालत्या रेल्वेत मोठ्या पडद्यावर आपल्या आवडत्या सिनेमाचा आनंद घेत आहेत. तुम्हाला वाटत असेल हे कसं? हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही अवाक् व्हाल. कारण काही लोकांना धावत्या रेल्वेत प्रोजेक्टर आणि चादरीच्या मदतीने एक छोटा सिनेमाहॉल तयार केला.
हा व्हिडीओ ब्लॉगर @ _anju_.singh_ ने इंस्टाग्रामवर 18 नोव्हेंबरला शेअर केला होता. त्याने कॅप्शनला लिहिलं होतं की, आम्ही सोबत असा प्रवास करतो. या व्हिडिओला आतापर्यंत 86 लाख व्ह्यूज मिळाले आणि 3 लाख 38 हजार लाइक्स मिळाले आहेत.
यात तुम्ही बघू शकता की, सीटचा एरिया पांढऱ्या चादरीने कव्हर केला आहे. तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यावर सिनेमा लावतात. हा देशी जुगाड पाहून लोक अवाक् झाले आहेत.