विमानातून रेकॉर्ड केला रॉकेट लॉन्चिंगचा अद्भुत नजारा, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:19 IST2023-05-19T09:18:49+5:302023-05-19T09:19:18+5:30

Viral Video : सामान्यपणे रॉकेट लॉन्चिंगचे फोटो किंवा जमिनीवरून घेतलेले फोटो समोर येत असतात. आकाशात रॉकेट उडताना पाहून वेगळा अनुभव मिळतो. पण आकाशातून रॉकेट लॉन्चचा व्हिडीओ क्वचितच कुणी पाहिला असेल.

Passenger record rocket launch from plane video goes viral | विमानातून रेकॉर्ड केला रॉकेट लॉन्चिंगचा अद्भुत नजारा, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

विमानातून रेकॉर्ड केला रॉकेट लॉन्चिंगचा अद्भुत नजारा, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

Viral Video : आजकाल बरेच लोक विमानाने प्रवास करतात. जे लोक विमानाने प्रवास करतात त्यातील जास्तीत जास्त लोकांची इच्छा असते की, त्यांना विंडो सीट मिळावी. जेणेकरून आकाशातील सुंदर नजारा, डोंगर, सागर, रात्रीचा अद्भुत नजारा त्यांना बघता यावा. बरेच लोक हे सगळे नजारे कॅमेरात कैद करतात. एका प्रवाशाने असंच केलं आणि त्याच्या कॅमेरात एक अद्भुत नजारा कॅप्चर झाला. या व्यक्तीने विमानातून रॉकेट लॉन्चिंगचा नजारा कॅमेरात कैद केला.

सामान्यपणे रॉकेट लॉन्चिंगचे फोटो किंवा जमिनीवरून घेतलेले फोटो समोर येत असतात. आकाशात रॉकेट उडताना पाहून वेगळा अनुभव मिळतो. पण आकाशातून रॉकेट लॉन्चचा व्हिडीओ क्वचितच कुणी पाहिला असेल. इंस्‍टाग्राम वर @plane.focus पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात आकाशातून रॉकेट लॉन्चिंगचा नजारा बघायला मिळत आहे. 

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देण्यात आलं आहे की, जेव्हा तुम्ही विमानात असता आणि यावेळीच रॉकेट लॉन्च करण्यात आलं तर...आधी हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. 18 फेब्रुवारीला शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 70 लाख लोकांनी पाहिला. साधारण 7 लाख लोकांनी लाइक केला. तर यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

एका यूजरने लिहिलं की, काय शानदार अनुभव आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, हे एखाद्या चमत्कारासारखं आहे. तर तिसऱ्याने लिहिलं की, हे जीवनात केवळ एकदाच होतं. सुपर कूल. एका व्यक्तीने असंही लिहिलं की, हा व्हिडीओ चुकून कॅप्चर केला नाही तर अधिकृत फुटेज आहे. जे रेकॉर्ड करण्यात आलं होतं.

Web Title: Passenger record rocket launch from plane video goes viral