सीमा हैदर पती सचिनसोबत 'बेपत्ता' असल्याचा दावा, 24 तासांपासून काहीच नाही त्यांचा पत्ता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 11:29 IST2023-07-17T11:27:44+5:302023-07-17T11:29:52+5:30

Seema Haider News : सचिनसोबत नोएडामध्ये राहणारी सीमा प्रेमासाठी भारतात आली. पबजी गेमिंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. नंतर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं.

Pakistani Seema Haider missing with lover Sachin from last 24 hours claims | सीमा हैदर पती सचिनसोबत 'बेपत्ता' असल्याचा दावा, 24 तासांपासून काहीच नाही त्यांचा पत्ता...

सीमा हैदर पती सचिनसोबत 'बेपत्ता' असल्याचा दावा, 24 तासांपासून काहीच नाही त्यांचा पत्ता...

Seema Haider News : प्रियकर सचिनसाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेली महिला सीमा हैदर सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. मीडियाचे लोक तिची मुलाखत घेण्यासाठी गर्दी करत आहेत तर लोकही तिला बघण्यासाठी तिच्या घरासमोर उभे आहेत. अशात गेल्या 24 तासांपासून सीमा सचिनसोबत गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांचा काहीच पत्ता लागत नाहीये. गेल्या 24 तासांपासून ते घरी नाहीयेत.

आपल्या चार मुलांना घेऊन घर सोडून आलेल्या पाकिस्तानी महिलेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यात असाही एक प्रश्न समोर आला की, सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते का? यावरून अनेक लोकांनी सोशल मीडियावर सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. पण बाबत काहीच समोर आलं नाही की, सीमा पाकिस्तानी गुप्तहेर आहे.

सचिनसोबत नोएडामध्ये राहणारी सीमा प्रेमासाठी भारतात आली. पबजी गेमिंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. नंतर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं. असाही दावा केला जात आहे की, भारतात येण्यासाठी तिने तिचं पाकिस्तानातील घरही विकलं.

अशात सीमा हैदर आणि सचिनची लव्हस्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पण ते दोघेही गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. दोघे कुठे आहेत याची काही माहिती समोर आलेली नाही. दोघेही घरी नाहीत.

सीमाच्या मैत्रिणीचा दावा

सीमा हैदरबाबत एका पाकिस्तानी तरूणीने दावा केला की, ती तिची बालपणीची मैत्रीण आहे. सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीने दावा केलाकी, सीमा दगाबाज आहे. सीमाच्या कथित मैत्रिणीने सचिनला सुद्धा सल्ला दिला आहे की, त्याने तिच्यापासून वाचून रहावं.  पाकिस्तानी तरूणी म्हणाली की, सीमा भारतात फक्त क्रिकेट बघण्यासाठी आली आहे. त्यानंतर ती पाकिस्तानात परत येईल.
 

Web Title: Pakistani Seema Haider missing with lover Sachin from last 24 hours claims