नशीबवान! मृत्यूनंतर 'या' कुत्र्यासाठी मालक सोडून गेला कोट्यावधींची प्रॉपर्टी, किती ते वाचून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 10:08 IST2021-02-13T10:04:42+5:302021-02-13T10:08:34+5:30
लुलूच्या मालकाचं त्याच्यावर फार प्रेम होतं. आपल्या कुत्र्याच्या देखरेखीसाठी त्याने ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आहे.

नशीबवान! मृत्यूनंतर 'या' कुत्र्यासाठी मालक सोडून गेला कोट्यावधींची प्रॉपर्टी, किती ते वाचून चक्रावून जाल...
कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे काही लोक त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणे वागवतात. कुत्रा आणि मनुष्याच्या मैत्रीची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. मात्र, अमेरिकेच्या नॅशविले शहरातील एका कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची अनोखी कहाणी समोर आली आहे.
मालकाने कुत्र्याला बनवलं कोट्याधीश
अमेरिकेतील नॅशविले शहरात एका व्यक्तीने त्याच्या कुत्र्याच्या नावावर तब्बल ५० लाख डॉलर म्हणजे जवळपास ३६ कोटी रूपयांची प्रॉपर्टी केली आहे. मालकाचं त्याच्या कुत्र्यावर असलेलं इतकं प्रेम पाहून सगळेच हैराण झाले आहेत. (हे पण वाचा : नशीब फळफळलं, केरळमधील दाम्पत्याला 3.3 कोटी रुपयांचा लागला बंपर जॅकपॉट)
५० लाख डॉलर म्हणजे जवळपास ३६ कोटी रूपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असलेल्या या कुत्र्याचं नाव आहे लुलू. हा कुत्रा बॉर्डर कोली प्रजातीचा आहे. लुलूच्या मालकाचं त्याच्यावर फार प्रेम होतं. आपल्या कुत्र्याच्या देखरेखीसाठी त्याने ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आहे. या कुत्र्याचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेला ठेवण्यात आलं असून तिला महिन्याला पगार दिला जातो.
मालकाचा झालाय मृत्यू
डब्ल्यूटीवीएफ टीव्हीच्या रिपोर्टनुसार, मार्था बर्टन जी लुलूचा सांभाळ करते त्यांनी सांगितले की लुलूचा मालक बिल डोरिस एक मोठा बिझनेसमन होता. गेल्यावर्षी २०२० मध्ये त्याचा मृत्यू झाला. मार्थाने पुढे सांगितले की, बिल डोरिसने त्यांच्या मृत्यूपत्रात आपल्या कुत्र्यासाठी रक्कम जमा करण्याची आणि त्यातून दर महिन्याला काही रक्कम देण्याची इच्छा व्यक्त केली होती. (हे पण वाचा : बोंबला! थंडी वाजत होती म्हणून नोटांची पेटवली शेकोटी, लाखो रूपयांची राख पाहून सगळेच हैराण...)
बर्टनने सांगितले की, बिल डोरिसचं आपला पाळीव कुत्रा लुलूवर खूप प्रेम होतं. बिल डोरिसला अंदाजही नव्हता की, लुलूचा सांभाळ करण्यासाठी इतकी रक्कम खर्चही होऊ शकेल की नाही. खरंच हा कुत्रा नशीबवान आहे.