बोंबला! थंडी वाजत होती म्हणून नोटांची पेटवली शेकोटी, लाखो रूपयांची राख पाहून सगळेच हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:27 PM2021-02-09T14:27:58+5:302021-02-09T14:39:10+5:30

या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या अ‍ॅंगलने विचार करत आहेत.

Mentally disturbed man burned 500 currency to get rid of cold in Mahoba | बोंबला! थंडी वाजत होती म्हणून नोटांची पेटवली शेकोटी, लाखो रूपयांची राख पाहून सगळेच हैराण...

बोंबला! थंडी वाजत होती म्हणून नोटांची पेटवली शेकोटी, लाखो रूपयांची राख पाहून सगळेच हैराण...

Next

हिवाळ्यात लोक थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कुणी घरात हिटर लावतात तर कुणी महागड्या रजई विकत घेतात. मात्र, उत्तर प्रदेशातील एका मानसिक रूग्णाने थंडीपासून वाचण्यासाठी जे केलं ते वाचून तुम्ही चक्रावून जाल.

महोबा शहर कोतवाली भागातील जुनी भाजी भंडी परिसरात या रस्त्यावर राहणाऱ्या मानसिक आजारी व्यक्तीने थंडीपासून वाचण्यासाठी चक्क ५००-५०० रूपयांच्या नोटांना आग लावली. बुंदेलखंडसारख्या भागात गरीब लोक मोठ्या प्रमाणात राहतात. अशात तिथे अशी घटना घडल्याने सगळेच हैराण झाले आहेत. (हे पण : बोंबला! कोर्टाने 'या' व्यक्तीला दिला ५ अब्ज किंमतीचा बंगला पाडण्याचा आदेश, मालक 'कोमात'...)

आजूबाजूच्या सफाई कर्मचाऱ्यांनुसार, या व्यक्तीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लाखो रूपयांनी नकदी रक्कम, २ अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसहीत एका धारदार शस्त्रही आगीत पेटवून दिलं. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लाखो रूपयांच्या नोटा जाळणारी ही व्यक्ती नंतर हसत होती आणि म्हणत होती की, काय करू, मला थंडी लागत होती, जे मिळालं ते जाळून थंडीपासून स्वत:चा बचाव केला. (हे पण वाचा : अरे देवा! चीनच्या अभिनेत्रीला नाकाची प्लास्टीक सर्जरी पडली महागात, याचा तिने कधी विचारही केला नसेल!)

या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या अ‍ॅंगलने विचार करत आहेत. पण आता प्रश्न हा उपस्थित राहतो की, या मनोरूग्ण व्यक्तीकडे इतके रोख रक्कम आली कुठून? या अजब घटनेवर पोलीस आणि प्रशासन काहीही बोलण्यास नकार देत आहेत.

Web Title: Mentally disturbed man burned 500 currency to get rid of cold in Mahoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.