अदर वर्ल्ड किंगडम - असा देश जिथे चालतं केवळ महिलांचं शासन, पुरूषांना वागवलं जातं गुलामांसारखं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:39 IST2026-02-26T15:36:17+5:302026-02-26T15:39:09+5:30
Other world kingdom : इथे महिलांना सर्वोच्च स्थान दिलं गेलं आणि इथे राणी पॅट्रिसिया - १ च्या नावाने शासन चालतं. तसेच या ठिकाणी पुरूषांसाठी वेगळे नियम आहेत.

अदर वर्ल्ड किंगडम - असा देश जिथे चालतं केवळ महिलांचं शासन, पुरूषांना वागवलं जातं गुलामांसारखं
Other world kingdom : महिलांचे अधिकार आणि सुरक्षा याबाबत नेहमीच जगभरात चर्चा ऐकायला मिळते. अशात एका अशा ठिकाणाचं नाव नेहमीच समोर येतं, ज्याबाबत दावा केला जातो की, तिथे पूर्णपणे महिलांच शासन आहे. इथे महिलांना सर्वोच्च स्थान दिलं गेलं आणि इथे राणी पॅट्रिसिया - १ च्या नावाने शासन चालतं. तसेच या ठिकाणी पुरूषांसाठी वेगळे नियम आहेत. असं सांगितलं जातं की, महिला इथे पुरूषांना गुलाम बनवून ठेवतात. पुरूषांना इथे जनावरांसारखं वागवलं जातं.
‘वुमन ओवर मेन’ अशी धारणा असलेला देश सगळ्यात विकसित देशांपैकी मानला जातो. हा देश यूरोपमध्ये आहे. या देशाचं नाव आहे ‘अदर वर्ल्ड किंगडम’. येथील शासन महिलांच्या हाती आहे. १९९६ मध्ये चेक रिपब्लिकमध्येच हा एक खाजगी पद्धतीने एक छोटा देश बनला. या देशाची एक राणी आहे आणि तिचं नाव पॅट्रिसिया-१ आहे. इथे तिचीच सत्ता चालते. त्यांनी आपली वेगळी करन्सी, पोलीस आणि पासपोर्ट आहे. पण आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने या देशाला देशाची मान्यता दिलेली नाही. येथील मूळ नागरिक केवळ महिला आहेत. पुरूषांना नागरिकता मिळत नाही.
‘अदर वर्ल्ड किंगडम’चे नियम
केवळ महिलांसाठीच असलेल्या या ‘अदर वर्ल्ड किंगडम’चे नियम जगापासून वेगळे आहेता. असं म्हटलं जातं की, जर कुणाला नागरिकता हवी असेल तर राणीच्या महालात कमीत कमी पाच दिवस गुलामी करावी लागते. त्यांना राणीच्या सगळ्या आदेशांचं पालन करावं लागतं. जर कुणी दुसऱ्या देशातून आलं तर त्यांना राणीसाठी सोफा बनवावा लागतो, दारू प्यायची असेल तर आधी दारू राणीच्या पायांवर टाकली जाते. त्यानंतरच गुलाम पिऊ शकतात.
कमीत कमी एक पुरूष गुलाम
राणी पॅट्रिसिया-१ ने या देशाची नागरिकता मिळवणाऱ्या महिलांसाठी काही नियम बनवले आहेत. जसे की, त्यांच्याकडे कमीत कमी एक पुरूष गुलाम असावा. महिला आपल्या सहमतीने त्याच्यासोबत संबंध ठेवू शकते. महिलेला कमीत कमी पाच दिवस राणीच्या महालात रहावं लागेल.
अदर वर्ल्ड किंगडमच्या सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. जे हे नियम पाळतील त्यांना ७.४ एकर जमिनीवर बनलेल्या या देशाची नागरिकता मिळू शकते. इथे काही इमारती, स्वीमिंग पूल, रेस्टॉरन्ट आणि नाइट क्लब आहेत. कैद्यांसाठी तुरूंगही आहेत. या मायक्रोनेशनची राजधानी ब्लॅक सिटी आहे. येथील पूर्ण संरचना खाजगी संपत्तीच्या रूपात विकसित करण्यात आलीये. हा देश चेक रिपब्लिकच्या कायद्यात येतो. इथे राहणाऱ्या लोकांना तोच राष्ट्रीय कायदा पाळावा लागतो, जो देशाच्या इतर भागांना लागू आहे.
अदर वर्ल्ड किंगडममधील नियमांनुसार, पुरूषांनी महिलांचा सन्मान करणं अनिवार्य आहे. यासाठी काही प्रतिकात्मक नियमही आहेत. जसे की, पुरूषांना कॉलर घालणं आणि मालकीनी सांगले तसं काम करणं असतं.