Optical Illusion: 'या' फोटोत लपलीये एक मुलगी; शोधून भलेभलेही थकले, तुम्हीही ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 17:51 IST2022-08-15T17:50:38+5:302022-08-15T17:51:34+5:30
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो (Optical Illusion) व्हायरल होत असतात.

Optical Illusion: 'या' फोटोत लपलीये एक मुलगी; शोधून भलेभलेही थकले, तुम्हीही ट्राय करा
सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. यातील काही तुमची परीक्षा घेतात तर, काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. बरेच लोक या प्रकारची कोडी खूप जोर देऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तीक्ष्ण बुद्धी असलेले काही लोकच ते सोडवू शकतात. या ऑप्टिकल इल्युशनच्या शेअर केलेल्या फोटोत पाहा तुम्हाला एक मुलगी दिसतेय का?
या फोटोत तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती दिसत असेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या फोटोमध्ये (Trending Photo) एक मुलगीही लपलेली आहे. पाहूया ती मुलगी कुठे आहे हे तुम्हाला ओळखता येतंय का…
हा फोटो जवळून पाहिल्यानंतर तुम्हाला यात उत्तर मिळण्याची शक्यता आहे. तरीही तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही, तर एकदा फोटोच्या मध्यभागी काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पण तरीही तुम्हाला हे कोडे सोडवता आले नाही, तरीही हरकत नाही, या ऑप्टिकल इल्युजनचे अचूक उत्तर खालील फोटोमध्ये दिले आहे.