फक्त ३० सेकंद 'या' फोटोकडे बघाच, तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही तुमचा विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:09 IST2022-12-01T13:07:01+5:302022-12-01T13:09:11+5:30
Optical Illusion : लोकांना हा फोटो पाहिल्यावर स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आहेत. म्हणजे बघा ना डोळ्यांसमोर ते दिसतंय जे नाहीये, तेही केवळ ३० सेकंदात.

फक्त ३० सेकंद 'या' फोटोकडे बघाच, तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही तुमचा विश्वास!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच दृष्टी भ्रम म्हणजेच विज्ञान. सोशल मीडियात एक जुना फोटो व्हायरल होत असून पुन्हा एकदा हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. लोकांना हा फोटो पाहिल्यावर स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आहेत. म्हणजे बघा ना डोळ्यांसमोर ते दिसतंय जे नाहीये, तेही केवळ ३० सेकंदात.
फोटोतील रेड डॉटवर बघा
या व्हायरल झालेला फोटो एका महिलेचा आहे. हा फोटो निगेटीव्ह फिल्टरसोबत आहे. ट्रिक ही आहे की, फोटोतील महिलेच्या नाकावर असलेल्या लाल रंगाच्या डॉटवर १५ ते ३० सेकंद बघायचं आहे. त्यानंतर फोटोवरून नजर हटवून दुसरीकडे बघा किंवा भिंतीवर बघा. पापण्या वेगाने हलवा. हे केल्यावर महिलेचा चेहरा तुम्हाला भिंतीवर दिसेल. तोही रंगीत फोटो.
चार महिन्यांनी फोटो पुन्हा व्हायरल
कदाचित हा फोटो काही महिन्यांपूर्वी पाहिला असेल. कारण चार महिन्यांआधी हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. पण आता पुन्हा एकदा हा फोटो व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो १.३ लाख लोकांनी शेअर केलाय. तर १५ हजारपेक्षा अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.