Optical Illusion : ‘या’ २ फोटोंमध्ये लपलेली मांजर शोधून दाखवा; सापडल्यास स्वत:ची पाठ थोपटाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:32 IST2022-05-11T10:09:50+5:302022-05-11T10:32:32+5:30

Optical Illusion : या फोटोमध्ये एक मांजर लपलेली आहे. जर तुम्ही थोडं संयमानं या फोटोंमध्ये पाहिलं, तर तुम्हीही शोधू शकाल यात लपलेली मांजर.

optical illusion can you find cat in this image goes viral test yourself | Optical Illusion : ‘या’ २ फोटोंमध्ये लपलेली मांजर शोधून दाखवा; सापडल्यास स्वत:ची पाठ थोपटाल

Optical Illusion : ‘या’ २ फोटोंमध्ये लपलेली मांजर शोधून दाखवा; सापडल्यास स्वत:ची पाठ थोपटाल

Optical Illusion : आजकाल ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक इमेज तुम्ही पाहिल्या असतील. कोणी ना कोणी त्या अनेकदा शेअर करत असतो. तुम्ही देखील कधीतरी आपल्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना असे फोटो पाठवून त्यांचीही नक्कीच परीक्षा घेतली असले. परंतु आता एक नवं चॅलेंज घेण्याची वेळ आली आहे. एक नवा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये एक मांजर झोपलेली दिसत आहे. परंतु ती या फोटोमध्ये कुठे आहे हे शोधणं मात्र कठीण आहे.

या फोटोमध्ये तुम्हाला लाकडाचे ओंडके दिसत असतील. यामध्येच कुठेतरी एक मांजर लपलेली तुम्हाला दिसेल. परंतु ती तुम्हाला इतक्या सहजासहजी दिसेल असं वाटत असेल तर ते शक्य नाही. अनेकांनी या फोटोमध्ये मांजर शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. तुम्हीही जरा शोधून पाहा. रेडिटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.


यापूर्वीही असे काही फोटो समोर आले होते. जसं वर असलेल्या फोटोमध्येही तुम्हाला एक मांजर लपलेली दिसेल. या फोटोमध्ये समोर ठेवलेल्या साहित्यांमध्ये तुम्हाला एक मांजर लपलेली दिसेल. या फोटोमध्येही मांजर कुठे आहे ते शोधून पाहा. लोकांनी या फोटोमध्ये मांजर कुठे लपली आहे हे फोटो खाली ट्वीट करून सांगितलं. आहे. प्रत्येकाला ते शक्य झालं असं नाही, पण ज्यांना शक्य झालं त्यांनी त्वरित ते शेअर करा. पाहा कुठे लपली आहे या फोटोत मांजर.

 

Web Title: optical illusion can you find cat in this image goes viral test yourself