बाई...! लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने केली 'अशी' डिमांड, ऐकून नवरदेव 'कोमात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:12 IST2024-12-19T13:11:25+5:302024-12-19T13:12:11+5:30

लग्नानंतर नवरी पतीच्या घरी आली. मधुचंद्राच्या रात्री चेहऱ्या दाखवण्यासाठी तिने पतीसमोर अशी काही डिमांड ठेवली की, त्याला धक्का बसला. 

On the first night of marriage bride demanded beer and ganja to husband | बाई...! लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने केली 'अशी' डिमांड, ऐकून नवरदेव 'कोमात'!

बाई...! लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने केली 'अशी' डिमांड, ऐकून नवरदेव 'कोमात'!

मधुचंद्राच्या रात्रीच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. कधी नवरी ऐनवेळी पळून जाते तर कधी नवरदेव पुरूष नसल्याचं समोर येतं. तर कधी नवरी-नवरदेवांच्या डिमांड चर्चेचा विषय ठरतात. सध्या उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून मधुचंद्राच्या रात्रीची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न लुधियानाला राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. लग्नानंतर नवरी पतीच्या घरी आली. मधुचंद्राच्या रात्री चेहरा दाखवण्यासाठी तिने पतीसमोर अशी काही डिमांड ठेवली की, त्याला धक्का बसला. 

news18.com च्या एका वृत्तानुसार, नवरीने पतीकडे लग्नाच्या पहिल्याच रात्री बिअर आणि गांजाची मागणी केली. पती आधी म्हणाला की, बिअर संपली आहे. तर तो बिअर घेण्यासाठी जाऊ लागला होता. तेव्हा नवरीने त्याला सोबतच गांजा आणण्यासही सांगितलं. इतकंच नाही तर बोकडाचं मटण आणण्यासही सांगितलं. नवरीच्या या डिमांड ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

नंतर तरूणाने ही सगळी बाब आपल्या परिवाराला सांगितली. ज्यानंतर घरात एकच वादळ उठलं. घरातील वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. जेव्हा पोलिसांनी घडलेला प्रकार ऐकला तर त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी दोन्ही पक्षाकडील लोकांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. तरूण म्हणाला की, बिअर पिणाऱ्या, गांजा ओढणाऱ्या आणि मांस खाणाऱ्या पत्नीसोबत तो राहू शकत नाही.

जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा नवरदेवाने नवरीवर आरोप लावला की, नवरी मुलगी नाहीये. नवरी किन्नर असल्याचा आरोप तरूणाच्या परिवाराकडून लावण्यात आला आहे. सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

Web Title: On the first night of marriage bride demanded beer and ganja to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.