२० वर्षाआधी केलेल्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं महिलेचं घर, बेस्ट फ्रेन्डच ठरली याला कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:03 IST2021-12-16T14:32:36+5:302021-12-16T15:03:46+5:30

पीडित महिलेने सांगितलं की, DNA टेस्टमध्ये हे स्पष्ट झालं की, मी खरं बोलत होते. पण माझ्या पतीने नातं संपवण्याचं बोलून मला धक्का दिला.

OMG! Woman's best friend ruined her marriage life now she is making physical relation with her husband | २० वर्षाआधी केलेल्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं महिलेचं घर, बेस्ट फ्रेन्डच ठरली याला कारण

२० वर्षाआधी केलेल्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं महिलेचं घर, बेस्ट फ्रेन्डच ठरली याला कारण

एका महिलेचा सुखी संसार तिच्याच बेस्ट फ्रेन्डने उद्ध्वस्त केलाय. ती फ्रेन्ड महिलेच्या घटस्फोटाचं कारण ठरली आणि ती तिच्या पतीसोबत फिजिकल रिलेशन ठेवत आहे. पीडितेने सोशल मीडियावर आपल्या फ्रेन्डच्या कारनाम्याचा खुलासा केला आहे. हे सगळं काही महिलेने पतीपासून लपवलेल्या एका चुकीमळे झालं. जी तिने कॉलेजच्या काळात केली होती. त्यावेळी महिलेचा पती तिचा बॉयफ्रेन्ड होता. महिलेने आपल्या पतीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला,  पण त्याने काहीच ऐकलं नाही. अखेर काही दिवसांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला.

बॉयफ्रेन्डला दिला होता दगा

'मिरर' च्या रिपोर्टनुसार, महिलेने रेडीटवर पोस्ट लिहून तिची फ्रेन्ड ज्यूलियाच्या कारनाम्याबाबत सांगितलं. सोबतच त्या चुकीबाबतही सांगितलं जी तिने पतीपासून लपवली होती. महिलेने लिहिलं की, '२० वर्षाआधी मी एक चूक केली होती. जूलियाच्या बोलण्यात येऊन मी माझ्या बॉयफ्रेन्डला दगा देत एका दुसऱ्या मुलासोबत रोमान्स केला होता. आमच्या शारीरिक संबंध नव्हते. मग दिवस मला जाणीव झाली की, मी जे काही करत आहे ते योग्य नाही'.

महिलेने सांगितलं की, जूलिया स्वत:ही आपल्या बॉयफ्रेन्डला दगा देत होती आणि तिने मलाही यासाठी प्रोत्साहित केलं. मी तिच्या बोलण्यात येऊन चूक केली. पण जेव्हा मला माझ्या चुकीची जाणीव झाली तेव्हा मी जूलियाला सगळं काही बंद करण्यास सांगितलं आणि ती सुद्धा तयार झाली. काही महिन्यांनी मी माझ्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न केलं. आम्ही वैवाहिक जीवनात फार आनंदी होतो. आम्हाला चार मुले झालीत. पण एक दिवस माझ्या बेस्ट फ्रेन्डनेच माझं जीवन उद्ध्वस्त केलं.

दारून पिऊन सगळं सांगितलं

महिला म्हणाली की 'जूलिया एक दिवस माझ्या घरी आली  आणि दारूच्या नशेत तिने माझ्या पतील माझ्या कॉलेजमधील चुकीबाबत सांगितलं. पण त्यातील जास्तीत जास्त खोटं होतं. तिने सांगितलं की, मी पतीला जास्त काळ दगा दिला आणि मी दुसऱ्या तरूणासोबत सगळ्या प्रकारचे संबंध ठेवले. ती गेल्यावर पतीने मला खरं काय ते सांगण्यास सांगितलं. मी सुद्धा त्याला सगळं सांगितलं. पण मग तो म्हणाला की, त्याला DNA टेस्ट करायची आहे. जेणेकरून हे समजावं की ही मुलं कुणाची आहेत. मी यासाठीही तयार झाले. मला वाटलं ही टेस्ट केल्यावर त्याची शंका दूर होईल, पण असं झालं नाही'.

पीडित महिलेने सांगितलं की, DNA टेस्टमध्ये हे स्पष्ट झालं की, मी खरं बोलत होते. पण माझ्या पतीने नातं संपवण्याचं बोलून मला धक्का दिला. तो म्हणाला की, त्याला आता माझ्यासोबत रहायचं नाही. २० वर्षाआधी केलेल्या चुकीमुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं. आणि यासाठी माझी बेस्ट फ्रेन्डच जबाबदार होती. महिलेला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला समजलं की, जूलिया तिच्या पतीसोबत रिलेशनमध्ये आहे. ती म्हणाली की, 'माझं घर तोडून ती माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत आहे. देव अशी मैत्रीण कुणालाही देऊ नये'.
 

Web Title: OMG! Woman's best friend ruined her marriage life now she is making physical relation with her husband