अरे बापरे बाप! पकडला गेला इतका लांब किंग कोब्रा की बघणारे बघतच राहिले, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:57 PM2021-09-22T12:57:18+5:302021-09-22T13:02:00+5:30

हा कोब्रा आणि त्यांची लांबी पाहून लोक हैराण झाले आहेत. एक फोटो व्हायरल झाला आहे  ज्यात काही लोक एका लांब कोब्रा सापाला पकडून आहेत. 

OMG! 12 ft long king cobra rescued by ranger pic will shock you | अरे बापरे बाप! पकडला गेला इतका लांब किंग कोब्रा की बघणारे बघतच राहिले, फोटो व्हायरल

अरे बापरे बाप! पकडला गेला इतका लांब किंग कोब्रा की बघणारे बघतच राहिले, फोटो व्हायरल

Next

किंग कोब्राचं नाव समोर आलं की, अनेकांच्या भुवया उंचावतात. या खतरनाक सापाला पकडणं सोपं नसतं कारण हा सर्वात जास्त विषारी साप मानला जातो. सोबतच त्याची लांबीही मोठी असते. तुम्ही सोशल मीडियावर कोब्राला पकडतानाचे अनके व्हिडीओ पाहिले असतील आणि तुम्हाला प्रश्नही पडला असेल की, व्यक्तीने या  सापाला पकडलं कसं. नुकताच एक कोब्रा पकडण्यात आला आहे. हा कोब्रा आणि त्यांची लांबी पाहून लोक हैराण झाले आहेत. एक फोटो व्हायरल झाला आहे  ज्यात काही लोक एका लांब कोब्रा सापाला पकडून आहेत. 

ट्विटरवर ही पोस्ट @svembu ने शेअर केली आहे. श्रीधर वेम्बू एका बिझनेसमन आहेत. या फोटोत ते इतर रेंजर्ससोबत एक १२ फूट लांब कोब्रा सापाला पकडून दिसत आहेत. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं की, 'एका दुर्मीळ १२ फूट लांब किंग कोब्राने आमचा प्रवास यशस्वी केला. स्थानिक रेंजर्सनी त्याला पकडलं आणि डोंगरात नेऊन सोडलं. इथे मी बहादुरीने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. एक फारच शुभ दिवस'.

लोकांनी हा फोटो व्हायरल केलाय. तसेच ट्विटवर लोक भरभरून कमेंट्सही करत आहेत. यातील अनेकांनी सांगितलं की, त्यांनाही कोब्रा सापाला स्पर्श करायचा आहे. 
 

Web Title: OMG! 12 ft long king cobra rescued by ranger pic will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.