या आज्जी म्हणतात यांच्या कुत्र्यानं पुस्तक लिहिलंय, काय आहे या अजब दाव्यामागचं सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:53 IST2021-12-06T19:51:38+5:302021-12-06T19:53:46+5:30

नॉर्थ वेल्समध्ये राहणाऱ्या ८० वर्षांच्या सिल्व्हिया इवान्स यांचा दावा आहे की त्यांना कुत्र्याची भाषा समजते. गेल्या अनेक दिवसांपासून त्या कुत्र्याच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी त्यांच्यात भाषेत संवाद साधत आहेत.

old woman claims her dog has written a book | या आज्जी म्हणतात यांच्या कुत्र्यानं पुस्तक लिहिलंय, काय आहे या अजब दाव्यामागचं सत्य?

या आज्जी म्हणतात यांच्या कुत्र्यानं पुस्तक लिहिलंय, काय आहे या अजब दाव्यामागचं सत्य?

एका महिलेनं कुत्र्याची भाषा शिकली असून (Language of dogs) त्याचे विचार पुस्तकरुपात लिहून काढल्याचं जाहीर केलं आहे. अनेकांना प्राण्यांची भाषा (Animal's language) समजत असल्याचं सांगितलं जातं. वास्तविक, त्यांना भाषा समजत नसते, तर प्राण्यांचे हावभाव आणि देहबोलीवरून त्यांच्या गरजा आणि मूड (Needs and moods of animals) यांचा अंदाज येत असतो. मात्र नॉर्थ वेल्समध्ये राहणाऱ्या महिलेली गोष्टच वेगळी आहे. ती प्राण्यांसोबत संवाद साधू शकते आणि तोही प्राण्यांच्याच भाषेत, असा तिचा दावा आहे.

नॉर्थ वेल्समध्ये राहणाऱ्या ८० वर्षांच्या सिल्व्हिया इवान्स यांचा दावा आहे की त्यांना कुत्र्याची भाषा समजते. गेल्या अनेक दिवसांपासून त्या कुत्र्याच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी त्यांच्यात भाषेत संवाद साधत आहेत. त्यांच्याकडे ३ वर्षांचा चिहुआहुआ आणि जॅक रसेल ब्रीड जातीचे कुत्रे आहेत आणि त्यांच्याशी सिल्व्हिया सातत्यानं संपर्क साधत असतात. आपले कुत्रे सातत्याने आपल्याशी संवाद साधतात आणि आपलं मनोगत व्यक्त करतात, असा तिचा दावा आहे.

आपल्या कुत्र्याने काही दिवसांपूर्वी पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सिल्व्हिया यांनी म्हटलं आहे. आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असून ते आपल्याला कागदावर उतरवायचे असल्याची भावना आपल्या कुत्र्याने व्यक्त केल्याचं त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी कुत्र्याचं मनोगत त्याच्या भाषेत ऐकलं आणि इंग्रजी भाषेत कागदावर उतरवून घेतलं. त्याच्या मनोगताचं एक पुस्तकच त्यांनी लिहिलं असून लवकरच ते बाजारात आणण्याचा त्यांचा मनोदय आहे.

सिल्व्हिया जे सांगतात ते अतर्क्य आणि अविश्वनीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मात्र आपल्या पतीच्या निधनानंतर आपले कुत्रे हाच आपला मानसिक आधार असून त्यांच्यासोबत आपण आनंदानं आयुष्य व्यतीत करत असल्याचं सिल्व्हिया यांनी म्हटलं आहे.

Web Title: old woman claims her dog has written a book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.