Shocking! सरकारी रुग्णालयात विचित्र प्रकार करायला लावायचा बॉस, नर्सचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 22:27 IST2021-10-17T17:30:25+5:302021-10-18T22:27:12+5:30
एका नर्सने रुग्णालयातील अशा एका विचित्र प्रयोगाबाबत सांगितलं आहे, ज्यामुळे आपल्याला धक्काच बसेल. सरकारी रुग्णालयात प्रयोग म्हणून चक्क पादायला लावायचे, असा खळबळजनक आरोप त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने केला आहे.

Shocking! सरकारी रुग्णालयात विचित्र प्रकार करायला लावायचा बॉस, नर्सचा खळबळजनक आरोप
वैद्यकीय क्षेत्र म्हणजे प्रयोग आलेच. यामुळेच एखाद्या आजारावर औषध उपलब्ध होतं, उपचाराची एक योग्य दिशा मिळते. पण एका नर्सने रुग्णालयातील अशा एका विचित्र प्रयोगाबाबत सांगितलं आहे, ज्यामुळे आपल्याला धक्काच बसेल. सरकारी रुग्णालयात प्रयोग म्हणून चक्क पादायला लावायचे, असा खळबळजनक आरोप त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने केला आहे.
यूकेमध्ये (UK) राहणारी नर्स सँड्रा सॅमसन (Sandra Samson) सरकारी एकलिंग हॉस्पिटमध्ये काम करायची. डिसेंबर २०१९ मध्ये तिला रुग्णालयातून अचानक काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिने रुग्णालयावर विचित्र आरोप लावला. रुग्णालयाबाबत तिने धक्कादायक खुलासे केले.
सँड्राने आरोपपत्रात म्हटलं आहे की, रुग्णालयातील तिचे बॉस आपल्या कर्मचाऱ्यांकडून विचित्र काम करून घ्यायचे. ते कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचे आणि विचित्र वातावरणात त्यांना काम करायला लावायचे. कर्मचारी भीषण उकाड्यात काम करायचे जेणेकरून त्यांना झोप येणार नाही आणि ते आरामात काम करतील. काम करण्याची जागा वेंटिलेटेड नव्हती. म्हणजे तिथं हवा खेळती नव्हती.
इतकंच नाही तर रुग्णालय प्रयोग म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांकडून खूप विचित्र काम करवून घ्यायचे, असं सांगत तिने रुग्णालयावर गंभीर आरोपही केले आहेत. तिने सांगितल्यानुसार ती खूप फिट होती, शिवाय तिला याआधी कोणता आजारही नव्हता. पण काही कालावधीने तिला डोकेदुखी, पोटदुखी आणि गॅसची समस्या झाली. याचं कारण म्हणजे रुग्णालयातील वातावरण आणि दिली जाणारी वागणूक. सँड्राने सांगितलं की तिला अशी औषधं दिली जायची, ज्यामुळे ते गॅस सोडायची. एक्सपरिमेंट म्हणून रुग्णालय असं करायचं.
हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. कोर्टात यावर सुनावणी झाली. रुग्णालयाने नर्स मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं. तसंच नर्सने जे आरोप लावले आहेत, त्याविरोधात ठोस पुरावे नाहीत, त्यामुळे रुग्णालयावर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.