नववर्षाचा पहिला सूर्योदय कुठे होतो? भारताआधी जगात इथे होते नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:05 IST2025-12-30T19:01:44+5:302025-12-30T19:05:25+5:30
New Year 2026 : जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत 'या' देशात होते.

नववर्षाचा पहिला सूर्योदय कुठे होतो? भारताआधी जगात इथे होते नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
New Year 2026 : भारतामध्ये आपण नववर्षे स्वागत करत असू, मात्र जगाच्या दुसऱ्या टोकावर नव्या वर्षाचे आगमन झाले आहे. पृथ्वीवरील वेगवेगळ्या टाइम झोनमुळे प्रत्येक देशात नवीन वर्ष वेगवेगळ्या वेळी सुरू होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जगात सर्वात आधी नवीन वर्ष कुठे साजरे होते?
पृथ्वीवर सर्वात आधी इथे उगवतो नववर्षाचा सूर्य
जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत किरिबाती या देशात होते. प्रशांत महासागरात वसलेल्या या द्वीपसमूहातील लाइन आयलंड्स भागात पृथ्वीवरील पहिला सूर्योदय दिसतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दिनरेषेनुसार (International Date Line) किरिबातीमध्येच सर्वात आधी 1 जानेवारीची सुरुवात होते.
का वेगवेगळ्या वेळी येते नवीन वर्ष?
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय दिनरेषा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ज्या भागावर सूर्यप्रकाश आधी पडतो, तिथे सूर्योदय आधी होतो. यावरुनच टाइम झोन ठरतात. पृथ्वीवरील 24 टाइम झोनमुळेच नवीन वर्षाचे आगमनही टप्प्याटप्प्याने होत जाते.
किरिबाती नंतर कुठे?
किरिबातीनंतर समोआ आणि टोंगा येथे नववर्षाचे स्वागत होते. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू होते. पुढे रशिया, फिजी, जपान, दक्षिण कोरिया, चीन, फिलीपिन्समध्ये नववर्ष येते.
भारतामध्ये नववर्ष कधी येते?
किरिबातीमध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता घड्याळ 1 जानेवारीत प्रवेश करते, तेव्हा भारतात 31 डिसेंबर दुपारी 3:30 वाजलेले असते. म्हणजेच भारतात नववर्षाचे स्वागत सुमारे 8-9 तासांनी होते.
तुलनेने इंग्लंडमध्ये तेव्हा सकाळचे 10 वाजलेले असतात, अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सकाळचे 5 वाजतात, तर अमेरिकेतील होनोलुलूमध्ये अजूनही 30 डिसेंबरची मध्यरात्र असते. किरिबाती आणि होनोलुलू यांच्यात जवळपास 24 तासांचा फरक दिसतो.