आठवड्याभरात संसार मोडला; तरुणाचा कूकर पत्नीला घटस्फोट; कारणही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:48 IST2021-10-02T15:47:06+5:302021-10-02T15:48:56+5:30
गेल्याच महिन्यात तरुणानं बांधली होती प्रेशर कूकरशी लगीनगाठ; आता घटस्फोट घेतला

आठवड्याभरात संसार मोडला; तरुणाचा कूकर पत्नीला घटस्फोट; कारणही सांगितलं
जकार्ता: जगात अनेक अजबगजब घटना घडत असतात. यामध्ये इंडोनेशियातील एका व्यक्तीचादेखील समावेश आहे. त्यानं काही दिवसांपूर्वीच कूकरसोबत विवाह केला होता. खोईरुल अनम नावाच्या व्यक्तीनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या लग्नाचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते. फोटोत अनम नवरदेवासारखा तयार झाला होता. तर प्रेशर कूकर सफेद कपड्यांमध्ये दिसत होता. त्यानं पत्नीसोबत लग्न विधी पूर्ण केले. त्यानंतर त्यानं पत्नीला किसदेखील केलं.
अनमनं लग्नाच्या कागदपत्रांवरदेखील स्वाक्षरी केली. तसे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. 'गोरी, आज्ञाधारक आणि जेवण करण्यात पटाईत', अशा शब्दांत अनमनं पत्नीचं कौतुक केलं होतं. मात्र अनमचं वैवाहिक जीवन फारसं चांगलं गेलं नाही. त्यामुळेच त्यानं घटस्फोट घेतला. पत्नी स्वयंपाकात केवळ भातच करते, असं अनमनं घटस्फोटाची घोषणा करताना म्हटलं.
अनमच्या लग्नाची अनेकांनी टिंगल केली. अनमचं लग्न म्हणजे केवळ एक पब्लिक स्टंट होता, अशी माहिती स्थानिक संकेतस्थळांनी दिली. अनम कायम अशा प्रकारचे स्टंट करून चर्चेत राहतो. तो त्यासाठीच ओळखला जातो. अनमच्या लग्नाचा स्टंट यशस्वी झाला. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.