भारतातील एक असं मंदिर जिथे जाण्याची कुणीही करत नाही हिंमत, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 10:18 AM2023-07-08T10:18:28+5:302023-07-08T10:21:28+5:30

Interesting Facts : जगात एक असंही मंदिर आहे जिथे लोक जाण्यास घाबरतात. हे मंदिर दुसरीकडे कुठे नाही तर भारतातच आहे. चला जाणून घेऊ लोक या मंदिरात जाण्यास का घाबरतात? 

Mysterious yamraj temple story where people scared to go there | भारतातील एक असं मंदिर जिथे जाण्याची कुणीही करत नाही हिंमत, कारण...

भारतातील एक असं मंदिर जिथे जाण्याची कुणीही करत नाही हिंमत, कारण...

googlenewsNext

Yamraj Temple : सामान्यपणे कुणीही मंदिरात जायला घाबरत नसतात. कारण ते त्यांच्या श्रद्धेचं ठिकाण असतं. तिथे त्यांना एक शांतता मिळते. लोक मंदिरात आपल्या समस्या दूर करण्यासाठी मंदिरात जाऊन देवाकडे साकडं घालतात. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की, जगात एक असंही मंदिर आहे जिथे लोक जाण्यास घाबरतात. हे मंदिर दुसरीकडे कुठे नाही तर भारतातच आहे. चला जाणून घेऊ लोक या मंदिरात जाण्यास का घाबरतात? 

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ज्या मंदिरात जाण्यास लोक घाबरतात ते मंदिर मृत्यूचा देवता यमराजचं आहे. हेच कारण आहे की, लोक या मंदिराच्या शेजारून जाण्यासही घाबरतात. हे जगातलं एकमेव असं मंदिर असेल जे यमराजाला समर्पित आहे. लोकांचं म्हणणं आहे की, या मंदिराला यमराजासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे यात त्यांच्याशिवाय कुणीही प्रवेश करू शकत नाही. हे मंदिर हिमाचल प्रदेश चम्बाच्या भरमोर इथे आहे.

गावातील लोक या मंदिराबाबत सांगतात की, या मंदिरात चित्रगुप्तसाठीही एक खास जागा ठेवण्यात आली आहे. यात ते मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचा लेखाजोखा ठेवतात. असेल म्हटले जाते की, या मंदिरात चार छुपे दरवाजे आहेत आणि हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंपासून बनवले आहेत. असे मानले जाते की, जे लोक जास्त पाप करतात, त्यांची आत्मा लोखंडाच्या दरवाजाने आत जाते, तर ज्याने पुण्य केलंय त्यांची आत्मा सोन्याच्या दरवाज्यातून आत जाते.  

या मंदिराला लोक धर्मेश्वर महावेद मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून ओळखतात. मुळात हिमाचलमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. हेही त्यांपैकी एक आहे. पण या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात लोक जात नाही. ज्यांना नमस्कार करायचाय ते बाहेरूनच करतात. 

Web Title: Mysterious yamraj temple story where people scared to go there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.