Muthappan Temple : 'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:15 IST2023-02-02T16:14:23+5:302023-02-02T16:15:29+5:30

Muthappan Temple : केरळमध्ये एक अनोखे मंदिर असून, इथं पाळीव कुत्र्यांचे बारसं केलं जातं.

Muthappan Temple : Unique tradition in 'Muthappan Temple'; naming ceremony of dog | Muthappan Temple : 'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण...

Muthappan Temple : 'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण...


Muthappan Temple : भारत विविधतेने नटलेला देश असून, इथे अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात. भारतातील अनेक मंदिरातही विविध प्रकारच्या प्रथेंचे पालन होते. भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात अशीच एक अनोख्या प्रथेचे पालन केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एक मंदिर आहे, जिथे लोक त्यांच्या कुत्र्यांना घेऊन येतात आणि त्यांचे नामकरण करतात.

केरळमध्ये आहे मुथप्पन मंदिर 
कन्नूरमधील तालिपरंबापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वलपट्टनम नदीच्या काठावर एक मंदिर आहे. या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर असल्याचे येथील स्थानिक लोक सांगतात. असे म्हणतात की येथे लोक आपली पाळीव कुत्रे आणतात आणि त्यांचे नामकरण करतात. तिरुवप्पन वेल्लाट्टम परंपरेत येथे कुत्र्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. याबाबतची अधिक माहिती येथील मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली. याठिकाणी कुत्र्यांचा नामकरण सोहळा आयोजित केला जातो. यासाठी कोणतेही शुल्क किंवा पावतीची आवश्यकता नाही.

पाळीव कुत्र्यांची नावे ठेवतात
तिरुवप्पन वेल्लाट्टम परंपरेदरम्यान, कोणीही आपल्या पाळीव कुत्र्याला या मंदिरात आणू शकतो आणि आशीर्वाद घेऊ शकतो. स्थानिक लोक सांगतात की शनिवार आणि रविवारी येथे खूप गर्दी असते. इथल्या पुजाऱ्याला मुथप्पन थेय्यम म्हणतात आणि नामकरण करताना तो कुत्र्याच्या कानात काहीतरी कुजबुजतो आणि शेवटी त्याला प्रसाद खायला घालतो. असे केल्यावर यम पाळीव प्राण्याला त्याच्या मालकाच्या स्वाधीन करतो.

भक्त ताडी आणि तळलेले मासे अर्पण करतात
मुथप्पन हा गरीब आणि कष्टकरी जनतेचा देव मानला जातो. भगवान मुथप्पनला ताडी आणि तळलेले मासे अर्पण केले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुत्र्यांना मुथप्पनचे साथीदार मानले जाते. त्यामुळे या मंदिरात कुत्र्यांचीही पूजा केली जाते. स्थानिक लोक भगवान मुथप्पन यांना धर्मनिरपेक्ष देवता मानतात.

Web Title: Muthappan Temple : Unique tradition in 'Muthappan Temple'; naming ceremony of dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.