धक्कादायक! कुत्र्यावर गोळी झाडत होती महिला, चुकून आपल्याच मुलाला शूट करून बसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:09 IST2021-06-02T16:07:38+5:302021-06-02T16:09:18+5:30
abc13 ने दिलेल्या वृत्तानुसार, २४ वर्षीय Angelia Mia Vargas आपल्या मुलासोबत आणि परिवारातील सदस्यांसोबत गल्लीत सायकल चालवत होती.

धक्कादायक! कुत्र्यावर गोळी झाडत होती महिला, चुकून आपल्याच मुलाला शूट करून बसली
अमेरिकेतील टेक्सासमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपल्या ५ वर्षीय मुलावर चुकून गोळी झाडली. ह्युस्टन पोलिसांनुसार, महिला धावत्या कुत्र्यावर गोळी झाडत होती. पण ती चुकून कुत्र्याला लागण्याऐवजी तिच्या मुलाला लागली.
abc13 ने दिलेल्या वृत्तानुसार, २४ वर्षीय Angelia Mia Vargas आपल्या मुलासोबत आणि परिवारातील सदस्यांसोबत गल्लीत सायकल चालवत होती. अशात ६ महिन्यांचा ब्रूनो नावाचा कुत्रा तिथे गल्लीत फिरत होता. शेजाऱ्यांनी सांगितले की, यादरम्यान अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला.
ब्रूनोच्या मालकाने सांगितले की, 'मी धावत धावत घरातून बाहेर आलो, कारण ब्रूनो भूंकत होता. मला वाटलं माझा भाऊ आला असेल म्हणून ब्रूनो भूंकत असेल. जेव्हा मी पाहिलं तेव्हा तो इकडे-तिकडे धावत होता'. Detective J Hasley म्हणाले की, महिलेने तीन वेळा फायर केले. यातील एक गोळी तिच्या मुलाला लागली. गोळी मुलाच्या पोटात लागली होती. ही गोळी छोट्या कॅलिबर पिस्तुलमधून झाडण्यात आली होती. सद्या या महिलेच्या मुलावर उपचार सुरू आहेत.
जशी मुलाला गोळी लागली त्याचे पालक जोरात ओरडले. ब्रूनोच्या मालकाने सांगितले की, त्या मुलाला गोळी लागल्यावर मला फार वाईट वाटलं. त्या दिवसापासून ते रात्री झोपू शकत नाहीये. त्यांना त्या मुलाच्या रडण्याचा आवाज रात्री ऐकू येतो. ब्रूनोला एका पायाला जखम झाली आहे. आता मुलाची तब्येत स्थिर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तेच महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशी करत आहेत.