धक्कादायक! प्लेटमध्ये चिली सॉस काढत होती महिला, बॉटलमधून जे बाहेर आलं ते पाहून फेकली प्लेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:26 IST2020-07-18T17:15:45+5:302020-07-18T17:26:33+5:30
सोशल मीडियावर यूकेत राहणाऱ्या ४७ वर्षीय पोली व्हेंटोने त्यांच्यासोबत झालेल्या विचित्र घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दोन मुलींची आई असलेल्या महिलेने लोकल मार्केटमधून एक चिली सॉसची बॉटल खरेदी केली होती.

धक्कादायक! प्लेटमध्ये चिली सॉस काढत होती महिला, बॉटलमधून जे बाहेर आलं ते पाहून फेकली प्लेट!
जगभरात अशा अनेक फूड इंडस्ट्रीज आहेत ज्या स्वस्त आणि कमी दर्जाचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकतात. या वस्तूंच्या किंमती खूप जास्त असतात पण क्वालिटी एकदम खराब असते. यांचा वापर केल्यावर जीवालाही धोका होऊ शकतो. आता हेच बघा ना यूकेतील दोन मुलींच्या आईला काय माहीत होतं की, ती मार्केटमधून जे चिली सॉस घेऊन आली त्याने त्यांचा जीवही जाऊ शकतो. जेव्हा खाण्यासाठी बाहेर काढला तर त्यातून अशी गोष्ट बाहेर आली की, ती जोरजोरात ओरडू लागली. महिलेने आणलेल्या सॉसचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे.
सोशल मीडियावर यूकेत राहणाऱ्या ४७ वर्षीय पोली व्हेंटोने त्यांच्यासोबत झालेल्या विचित्र घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दोन मुलींची आई असलेल्या महिलेने लोकल मार्केटमधून एक चिली सॉसची बॉटल खरेदी केली होती.
महिला तशी तर घराजवळील या मार्केटमध्ये शॉपिंग करत नव्हती. पण लॉकडाऊनमुळे तिला लिड्स नावाच्या लोकल चेन असलेल्या मॉलमधून तिने ही खरेदी केली. तिच्या मुलींना तिखट खाणं पसंत आहे. त्यांनी जे चिली सॉस खरेदी केलं होतं त्याची एक्सपायरी डेट मार्च २०२२ होती. जेव्हा घरी येऊन पोलोने प्लेटमध्ये सॉस काढला तर त्यातून पालीचं मुंडकंही बाहेर आलं. ते पाहून पोलो जोरात ओरडल्या. त्याहूनही वाईट म्हणजे जोपर्यंत त्यांची नजर पालीच्या मुंडक्यावर पडणार, तोपर्यंत त्यांनी सॉसचे काही घास खाल्लेही होते.
पोलो यांच्यासोबत त्यांच्या मुलीही सॉस खात होत्या. या घटनेमुळे संपूर्ण परिवार हैराण झाला आहे. पोलो म्हणाल्या की, त्या कंपनी विरोधात केस करणार आहेत. या घटनेमुळे पोलो आणि त्यांच्या दोन्ही मुलींना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी सुपरमार्केट चेनवरही केस ठोकली आहे.
पण पोलो यांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत माफीचा एक कॉलही आला नाही. कोरोना काळात अशाप्रकारचा बेजबाबदारपणा फारच शॉकिंग आहे. यात कुणाचा जीवही जाऊ शकला असता. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे. फूड एक्सपर्ट्सनी पालीचं मुंडकं ताब्यात घेतलं आहे. सोबत ग्राहकांना जो धक्का लागला त्यासाठी कंपनीवर केसही केली गेली आहे.
Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....
Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!