सगळ्यात विषारी साप ज्याचं १ ग्रॅम विष ८ लाख रूपयांना मिळतं, वाचा कसं काढतात सापाचं विष आणि कसं बनवलं जातं औषध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:48 IST2026-02-25T11:45:34+5:302026-02-25T11:48:50+5:30
Snakes Poisonous Price : आपल्याला आश्चर्य वाटेल की, या इन्स्टिट्यूटला भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर या सापांच्या हाय क्वालिटीच्या विषाला ई-लिलावात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळते.

सगळ्यात विषारी साप ज्याचं १ ग्रॅम विष ८ लाख रूपयांना मिळतं, वाचा कसं काढतात सापाचं विष आणि कसं बनवलं जातं औषध?
Snakes Poisonous Price : नेहमीच सापाच्या दंशाने मनुष्यांचा जीव गेल्याच्या घटना समोर येत असतात. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५५ लाख लोकांची जीव सापांच्या दंशाने जातो. दरवर्षी हजारो लोकांचा जीव जातो. काही सापांचं विष इतकं खतरनाक असतं की, काही सेकंदात व्यक्तीचा जीव जातो. दुसरीकडे सापाचं विष अनेक औषधं बनवण्यासाठी देखील केला जातो. सापाच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी गुजरातमध्ये अँटी-व्हेनम औषधं बनवण्यावर काम सुरू आहे. यात धरमपुरीमधील स्नेक रिसर्च इन्स्टिट्यूट महत्वाची भूमिका बजावत आहे.
आपल्याला आश्चर्य वाटेल की, या इन्स्टिट्यूटला भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर या सापांच्या हाय क्वालिटीच्या विषाला ई-लिलावात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळते. अशात आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सापांचं विष कसं काढलं जातं आणि त्यापासून औषध कसं बनवलं जातं. सोबतच सगळ्यात विषारी साप कोणता आणि त्याच्या विषाची किंमत किती हेही जाणून घेऊया.
कसं काढलं जातं सापांचं विष?
आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण सापांचं विष काढणं सगळ्यात कठिण काम असतं. हे काम खूप सावधगिरीने आणि एक्सपर्ट टीमच्या मदतीने केलं जातं. याला स्नेक मिल्किंग असंही म्हटलं जातं. या प्रोसेसमध्ये सापाचं तोंड उघडून ते एखाद्या डबीवर किंवा बॉटलवर दाबलं जातं, जेणेकरून त्याने सोडलेलं विष त्यात जमा व्हावं.
कसं बनवलं जातं औषध?
अँटी-व्हेनम तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा फार किचकट असते. सापाचं विष काढल्यानंतर त्याचं शुद्धीकरण केलं जातं. वेगवेगळ्या सापांसाठी वेगवेगळे अँटी-व्हेनम तयार केले जातात. कारण प्रत्येक सापांच्या विषामध्ये वेगवेगळे विषारी तत्व असतात. अँटी-व्हेनम तयार करण्यासाठी बराच वेळही लागतो आणि पैसाही. अँटी-व्हेनम तयार करण्याचा उद्देश सापाच्या दंशामुळे होणारे मृत्यू रोखणं हा आहे.
कोणत्या सापांचं विष सगळ्यात महाग?
इंडियन कोब्रा, रसल्स वायपर आणि किंग कोब्रा या सापांचं विष सगळ्यात महाग मानलं जातं. काही रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कोब्राच्या चांगल्या क्वालिटीच्या विषारी किंमत ५ ते १० हजार डॉलर प्रति ग्रॅम म्हणजेच ४ ते ८ लाख रूपये इतकी असते. तेच किंग कोब्राच्या विषाची किंमत १० हजार डॉलर प्रति ग्रॅम असते. किंग कोब्राच्या विषामध्य 'जो ओहानिन' नावाचं प्रोटीन असतं, जे वेदना कमी करण्याच्या कामात येतं. सगळ्यात विषारी सापांमध्ये डेजर्ट डॅथ ऐडरच्या एक ग्रॅम विषाला ३ हजार डॉलर, ब्राउन स्नेकच्या विषााला ४ हजार डॉलर आणि कोरल स्नेकच्या विषाला ४ हजार डॉलर प्रति ग्रॅम इतकी किंमत मिळते.