'या' प्रसिद्ध मॉडेलनं केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:52 IST2019-08-01T15:47:54+5:302019-08-01T15:52:17+5:30

लग्न म्हटलं की, एक नवरा आणि एक नवरी असते. पण अनेकदा काही लोक वेगळं करण्याच्या नादात असं काही करतात की, पाहणारेच विचारात पडतात.

This morning people stunned as a woman marries her dog live on the show | 'या' प्रसिद्ध मॉडेलनं केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!

'या' प्रसिद्ध मॉडेलनं केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!

लग्न म्हटलं की, एक नवरा आणि एक नवरी असते. पण अनेकदा काही लोक वेगळं करण्याच्या नादात असं काही करतात की, पाहणारेच विचारात पडतात. 49 वर्षांची स्विमसूट मॉडेल एलिजाबेथ होडने लग्न केलं आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये नवीन काय? लग्न तर केलं आहे. या लग्नात नवरी तर एलिजाबेथ होती, पण नवरा मात्र एक 6 वर्षांचा कुत्रा होता. बसला ना धक्का... एवढचं नाहीतर हे लग्न जगभरातील लोकांनी पाहिलं कारण, ब्रिटनमधील प्रसिद्ध टिव्ही शो 'द मॉर्निंग'ने हे लग्न लाइव्ह टेलिकास्ट केलं होतं. अनेक प्रेक्षक हे लग्न पाहून हैराण झाले. या लग्नामध्ये नवरा असलेल्या कुत्र्याचे ना लोगन आहे. हा कुत्रा गोल्डन रिट्रिवर प्रजातीचा आहे. या प्रकरणावर लोकांनी ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.


 
200 पेक्षा जास्त लोकांना केलं डेट 

एलिजाबेथ होड, इंग्लंडच्या एस्कॉटपैकी एक आहे. 80 च्या दशकातील प्रसिद्ध स्विमसूट मॉडल असून अनेक बड्या लोकांसोबत तिचं नाव जोडलं गेलेलं होतं. एवढचं नाहीतर तिने 200 पेक्षा जास्त लोकांना डेट केलं होतं. पण तरिसुद्धा तिला खरं प्रेम काही मिळालं नाही. तिला 25 वर्षांचा एक मुलगाही आहे. 

लोगनसोबत घालवणार आपलं आयुष्य

रिपोर्ट्सनुसार, एलिजाबेथ सांगते की, तिला आयुष्यभराचा सोबती म्हणून कुठल्याही पुरुषाची गरज नाही. ती तिचं पुढिल आयुष्य लोगनसोबत घालवणार आहे. 

'द मॉर्निंग'ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एलिझाबेथच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. तसेच 1400 रिट्विट्स आणि जवळपास 4500 लाइक्स मिळाले आहेत. 

लोकांनी केल्या अशा कमेंट्स...

Web Title: This morning people stunned as a woman marries her dog live on the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.