ही मॉडेल तिच्या आयुष्यात आहे अत्यंत दु:खी कारणं हिला कुणी मैत्रिणीच नाहीत, कारण ऐकुन बसेल धक्का....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:54 IST2021-09-08T18:23:46+5:302021-09-08T18:54:45+5:30

न्यूयॉर्क मधील मॉडेल मोरिया मिल्स (Moriah Mills) तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीत खूप यशस्वी आहे. ज्यामुळे तिचे अनेक चाहते आहेत. मात्र तिला एकही मैत्रीण नाही. बऱ्याचदा आपण बघतो की, सेलेब्रिटींचे अनेक मित्र मैत्रिणी असतात. परंतु मॉडेल मोरया मिल्सची कहाणी काही वेगळीच आहे.

moriah mills new york bases model says she do not have any girl friends, know why | ही मॉडेल तिच्या आयुष्यात आहे अत्यंत दु:खी कारणं हिला कुणी मैत्रिणीच नाहीत, कारण ऐकुन बसेल धक्का....

ही मॉडेल तिच्या आयुष्यात आहे अत्यंत दु:खी कारणं हिला कुणी मैत्रिणीच नाहीत, कारण ऐकुन बसेल धक्का....

न्यूयॉर्क मधील मॉडेल मोरिया मिल्स (Moriah Mills) तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीत खूप यशस्वी आहे. ज्यामुळे तिचे अनेक चाहते आहेत. मात्र तिला एकही मैत्रीण नाही. बऱ्याचदा आपण बघतो की, सेलेब्रिटींचे अनेक मित्र मैत्रिणी असतात. परंतु मॉडेल मोरया मिल्सची कहाणी काही वेगळीच आहे. 

द सनच्या रिपोर्टनुसार, २७ वर्षीय मॉडेल मोरिया म्हणते की, मुलींना माझ्याशी मैत्री करायची नाही. कारण मी इतकी सुंदर आहेत की, मुली माझ्याशी मैत्री करायला घाबरतात. माझ्या मैत्रिणींना अनेकदा भीती वाटते की, माझ्याशी ओळख करुन दिली तर ते आपला जोडीदार गमावतील. मोरिया असेही सांगते की, मला आता या सगळ्याची सवय झाली आहे. त्यामुळे मी आता यासगळ्याचा विचार करणं सोडून दिलं आहे. आता मी फक्त स्वतःवर प्रेम करते.

मोरियाचे इन्स्टाग्रामवर 100k फॉलोअर्स आहेत. तिच्या आयुष्याबद्दल सांगताना तिने आपल्या फॉलोअर्सना सांगितले, 'मुलींच्या नवऱ्यांना आणि बॉयफ्रेंडला मी आवडते. मी खूप चांगली आहे पण लोकांना असे वाटते की, मी गर्विष्ठ आहे आणि माझ्या सौंदर्यामुळे त्यांना असे वाटू शकते.  प्रत्यक्षात मी खूप नम्र आहे.

शालेय काळात खूप लाजाळू असलेल्या मोरियाने (Moriah Mills) नेहमीच स्वतःला स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले. तथापि, आता ती लोकांवर विश्वास ठेवायला शिकत आहे. मॉडेलिंग व्यतिरिक्त, मोरिया गाते देखील. ती रॅप देखील करते. ती म्हणते मी एकटी आहे पण आनंदी आहे. मला पुरुष चाहत्यांची कमतरता नाही.

Web Title: moriah mills new york bases model says she do not have any girl friends, know why