स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले पिलाला, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:17 IST2021-08-04T17:15:05+5:302021-08-04T17:17:46+5:30

Social media viral video: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक माकडाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

The monkey saved his baby by risking his own life, video goes viral | स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले पिलाला, व्हिडिओ व्हायरल

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले पिलाला, व्हिडिओ व्हायरल

जगात सर्व काही मिळेल, पण दुसरी आई कधीच मिलणार नाही. आईच असते, जी अडचणीत सापडलेल्या आपल्या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काहीही करायला तयार असते. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका माकडाने तिच्या मुलाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत माकडाच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, माकडाचे एक पिलु विजेच्या तारावर अडकलं आहे. त्याच्या सोबतचे इतर माकडं समोरील इमारतीवर उड्या मारतात, पण त्याला उडी मारता येत नाही. समोरील इमारतीव त्या माकडाची आईदेखील आहे.

आपल्या पिलाला उडी मारता येत नाही, हे पाहून तिचा जीव कासावीस होत असल्याचं दिसतंय. अखेर आपल्या पिलाला वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव धोक्यात घालून विजेच्या तारेवर उडी मारते आणि आपल्या पिलाला कडेवर घेऊन पुन्हा इमारतीवर जाते. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडतोय आणि त्यावर विविध कमेंटही केल्या जात आहेत.
 

Web Title: The monkey saved his baby by risking his own life, video goes viral