माकड की डॉल्फिन, दोन्हींपैकी कोणता प्राणी जास्त बुद्धिमान? उत्तर वाचून नक्की व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:11 IST2026-01-21T12:38:08+5:302026-01-21T13:11:18+5:30
Interesting Facts : जर डॉल्फिन आणि माकडामध्ये सगळ्यात बुद्धिमान कोण? असा प्रश्न असेल तर काय उत्तर असेल. तेच आपण जाणून घेणार आहोत.

माकड की डॉल्फिन, दोन्हींपैकी कोणता प्राणी जास्त बुद्धिमान? उत्तर वाचून नक्की व्हाल अवाक्
Interesting Facts : पृथ्वी कितीतरी प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. प्रत्येकांची आपली एक वेगळी खासियत असते. सामान्यपणे कुत्रा, मांजर, बैल, गाय, हत्ती, घोडे या प्राण्यांबाबत आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. बऱ्याचदा मित्रांमध्ये प्राण्यांबाबत चर्चा होत असताना असा विषय निघतो की, सगळ्यात बुद्धिमान प्राणी कुठला? यावर बरेच लोक कुत्रा, हत्ती असं उत्तर देतात. कुणी माकड म्हणतात. इतकंच नाही तर अनेकदा असंही समोर येतं की, डॉल्फिन खूप बुद्धिमान असते. पण मग जर डॉल्फिन आणि माकडामध्ये सगळ्यात बुद्धिमान कोण? असा प्रश्न असेल तर काय उत्तर असेल. तेच आपण जाणून घेणार आहोत.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून डॉल्फिन अधिक बुद्धिमान
वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉल्फिनला माकडापेक्षा अधिक बुद्धिमान मानली जाते. यामागचं मुख्य कारण म्हणजे तिचा ब्रेन-टू-बॉडी रेशो म्हणजे शरीराच्या प्रमाणात मेंदूचा आकार. डॉल्फिनमध्ये हा अनुपात खूप जास्त असतो, ज्यामुळे तिची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता अधिक विकसित होते. इतकंच नाही तर डॉल्फिन अवघड सामाजिक गटांमध्ये राहतात आणि विशिष्ट आवाजांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात. संशोधनानुसार डॉल्फिनमध्ये आत्म-जाणीव आढळते, म्हणजेच ती स्वतःला ओळखू शकते. त्यामुळे समस्या सोडवणे आणि नव्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणे यात ती अत्यंत कुशल असते.
माकडांची चतुराई आणि माणसासारखी समज
आता माकडांबाबत जाणून घेऊया. जरी माकडांना डॉल्फिनइतके बुद्धिमान मानले जात नसले, तरी त्यांची चतुराई कमी लेखण्यासारखी नाही. माकडांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हातांचा वापर. ते माणसांसारखे साधनं वापरू शकतात. जसे की काठी किंवा दगड वापरून फळं तोडणे किंवा अन्न बाहेर काढणे. याशिवाय माकडे आपल्या आसपासच्या वातावरणाकडे बारकाईने लक्ष देतात आणि लहानसहान बदलही पटकन ओळखतात. हीच क्षमता त्यांना जंगलात टिकून राहण्यास मदत करते. सामाजिकदृष्ट्याही माकडे गटात राहून निर्णय घेतात, जे त्यांच्या बुद्धिमत्तेचं द्योतक आहे.
मग सर्वात बुद्धिमान कोण?
जर वैज्ञानिक संशोधन आणि तथ्यांचा आधार घेतला, तर डॉल्फिनला जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानलं जातं. तिची विचारशक्ती, सामाजिक वर्तन आणि आत्म-जाणीव तिला माकडापेक्षा एक पाऊल पुढे ठेवतात.
दुसरीकडे, माकडे त्यांच्या चपळ बुद्धी, साधनांचा वापर आणि जलद शिकण्याच्या क्षमतेमुळे खास ठरतात. एकंदरीत पाहिलं तर, दोन्ही प्राणी आपल्या-आपल्या वातावरणात विलक्षण बुद्धिमत्ता दाखवतात. फरक एवढाच की डॉल्फिनची बुद्धिमत्ता वैज्ञानिक निकषांवर अधिक ठोस ठरते, तर माकडांची समज आपल्याला माणसांशी अधिक मिळतीजुळती वाटते.